Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

केस कापताना पंडितजींची शेंडीही कापली! सलूनवाल्यावर गुन्हा दाखल!!

August 10, 2021
in featured, कायदा-पोलीस
0
pandit

मुक्तपीठ टीम

तसे शेंडी ठेवणारी माणसं आता कमीच दिसतात. धार्मिक कारणास्तव काही व्यक्ती मात्र आवर्जून शेंडी राखतात. त्यांचा शेंडीसाठी एक वेगळा आग्रह असतो. शेंडीबद्दल कोणी चेष्टा केलेलीही त्यांना स्वाभाविकच खपत नाही. अशावेळी जर ती शेंडीच नाहीशी झाली तर? स्वाभाविकच असा शेंडीप्रेमी माणूस जमदग्नीचा अवतार धारण करतोच करतो. मात्र, आजवर यामुळे कधी गुन्हा दाखल झाल्याचं कानावर आलं नव्हतं, आता मात्र तसं घडलंय. एका पंडितजींची शेंडी कापली गेल्यामुळे त्यांनी सलूनवाल्यावर गुन्हा दाखल केला आहे.

 

डेहरादूनच्या एका पंडितजींची चक्क शेंडी कापल्याची घटना घडली आहे. नेहमीच्या सलूनवाल्याकडे केस कापायला गेलेले पंडितजी शिवानंद कोटनाला जेव्हा केस कापून घरी आले, तेव्हा आपल्या डोक्यावरील शेंडी गायब झाल्याचं त्यांना समजले. ते पाहून त्यांना राग आला आणि त्यांनी सलूनचालकाविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची चर्चा रंगली आहे.

 

नेमकं काय घडलं?

  • डेहराडूनच्या नवाडा भागात राहणारे पंडित शिवानंद कोटनाला रविवारी भावेश सलूनमध्ये केस कापण्यासाठी गेले होते.
  • केस कापून झाल्यावर त्यांनी त्यांच्या केसांना कलरही करून घेतला.
  • घरी आले आणि एका तासानंतर रंग वाळल्यानंतर आंघोळीला गेले.
  • डोक्यावरून पाणी ओतून घेताना सलूनमध्ये केस कापताना आपली शेंडीदेखील कापली गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
  • तेव्हा त्यांना राग आला आणि ते ते सलूनपाशी पोहोचले.
  • शेंडी कापल्याच्या मुद्द्यावरून पंडितजी आणि सलूनवाल्यामध्ये भांडण झालं.
  • त्याच रागात पंडितजींनी पोलीस स्टेशन गाठलं आणि सलून चालकाविरोधात तक्रार दाखल केली.
  • पंडित शिवानंद कोटनाला यांनी धार्मिक भावना दुखावणे, शिविगाळ करणे, मारपीट करणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे, असे गुन्हें सलून चालकाविरोधात नोंदवण्यात आले आहेत.
  • पोलीस या प्रकरणी कारवाई करत आहेत.

Tags: Panditsaloon ownerडेहरादूनपंडितसलूनचालक
Previous Post

“पूरग्रस्तांना विम्याचे पैसे लवकर मिळावेत!”

Next Post

पूराचा तडाखा बसलेल्या कोकणातील रस्त्यांसाठी १०० कोटीचा निधी

Next Post
pravin darekar-nitin gadkari

पूराचा तडाखा बसलेल्या कोकणातील रस्त्यांसाठी १०० कोटीचा निधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!