Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“ठरवलं तर दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटून उठेल, पण संयमानं शिस्त पाळायचीच”!

खासदार संभाजी छत्रपतींची पुढचं मूक आंदोलन नांदेडला करण्याची घोषणा

August 10, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
maratha reservation pune (4)

मुक्तपीठ टीम

खासदार संभाजी छत्रपती यांनी संयंम आणि शिस्त पाळायलाच लागेल, हे बजावतानाच, ठरवलं तर दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटून उठू शकतो असे सांगून पुन्हा एकदा लढा सुरु करण्याचा राज्य सरकारला इशारा दिला आहे. पुण्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यव्यापी बैठकीत खासदार संभाजी छत्रपती आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नांदेडमध्ये पुढचं मूक आंदोलन होणार असल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली आहे.

maratha reservation pune (3)

खासदार संभाजी छत्रपती पुण्यात मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीमध्ये बोलत होते. यात मराठा समाजाकडून सरकारकडे करण्यात आलेल्या मागण्यांचा ज्या त्या जिल्ह्यातील समन्वयकांकडून विषयवार आढावा घेण्यात आला. या बैठकीत काही काळ गोंधळ पाहायला मिळाला. या बैठकीला राज्यातील १७५ तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

maratha reservation pune (2)

काय म्हणाले खासदार संभाजी छत्रपती?

  • राज्यातील कोरोना परिस्थिती आणि काही दिवसांपूर्वीची पूरस्थिती पाहता आम्ही शांत राहिलो.
  • परिस्थितीचं भान आम्ही राखलं पण आमच्या प्रश्नांचं काय, याचं उत्तर सरकारला द्यावंच लागणार आहे.
  • जो वंचित आहे त्याला आरक्षण मिळालंच पाहिजे ही माझी स्पष्ट भूमिका असून मराठा समाजाला टिकणारं आरक्षण कसं द्यायचं हे सरकारने ठरवायला हवं.
  • ती सरकारचीच जबाबदारी आहे.
  • त्यासाठी डोकं लावा.
  • मी मॅनेज होणारा नेता नाही, माझ्यावर विश्वास ठेवा.
  • आंदोलन करायचं की काय करायचं हे तुम्ही सगळ्यांनी ठरवा.
  • तुम्ही जे म्हणाल ते करायला मी तयार आहे.
  • तुम्ही सांगितलं तर मी उपोषणाला बसायलाही तयार आहे.
  • तुम्ही सांगाल तितके दिवस मी उपोषणाला बसेन.मंत्र्यांसोबत २२ मागण्यांसाठी बैठक घेण्यात आली होती.
  • आता त्या मागण्यांबाबत काय झाले.
  • वसतिगृहांबाबत राज्य सरकारने जीआर काढून दाखवावा.
  • आता दोन महिन्यांचा कालावधी पुर्ण झाला आहे.
  • आता मराठा आरक्षणासाठी एक आंदोलन करावे लागणार आणि ते आंदोलन नांदेडला करु.

maratha reservation pune (1)


Tags: Maratha Reservationmp sambhaji chhatrapatiखासदार संभाजी छत्रपतीमराठा आरक्षणमराठा क्रांती मोर्चा
Previous Post

मुंबईच्या शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियात नोकरीची संधी

Next Post

“शेतकऱ्यांच्या मालकीचे सहकारी साखर कारखाने शेतकऱ्यांनीच चालवावे”: राजू शेट्टी

Next Post
raju shetti

"शेतकऱ्यांच्या मालकीचे सहकारी साखर कारखाने शेतकऱ्यांनीच चालवावे": राजू शेट्टी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!