मुक्तपीठ टीम
मारुती सुझुकीची बहुप्रतिक्षित 3 डोर ऑफरोडर कार आता सज्ज झाली आहे. मारुती सुझुकी जिन्मीच्या 3 डोर मॉडेलची भारतातून निर्यात सुरू केली आहे. पहिल्या तुकडीमध्ये १८४ गाड्या दक्षिण अमेरिकेत निर्यात करण्यात आल्या आहेत.
दक्षिण अमेरिकेव्यतिरिक्त मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड आता मध्य पूर्व आणि आफ्रिकन बाजारात निर्यात करणार आहे. यात दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया आणि पेरू सारख्या देशांचा समावेश आहे.
कंपनी आपल्या गुरुग्राम प्लांटमध्ये ही ऑफरोडर कार तयार करीत आहे. बॉक्सी प्रोफाइलवाली एसयूव्ही रग्ड स्टाईलसह येते. एसयूव्हीच्या मस्क्युलर लुकमध्ये भर घालणाऱ्या पुढील अॅक्सेसरीजचा समावेश आहे:
- फ्रंटला 5-स्लेट ग्रिल
- सर्कुलर एलईडी हेडलॅम्प्स
- ब्लॅक बम्पर
- बॉडीच्या चारही
- बाजूला क्लॅडिंग
- बाहेर निघणारे व्हील आर्च
- स्पेअर व्हील्स
जिन्मी एसयूव्ही लेटेस्ट फिचर्ससह सुसज्ज असेल:
- अँड्रॉइड ऑटो
- अॅपल कारप्ले
- ७ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम
याशिवाय, एसयूव्हीला पुढील फिचर्स असतील:
- ऑटोमॅटीक एसी
- ऑडिओ आणि क्लायमेंट कंट्रोल्स, हीटेड फ्रंट सीट्स
- क्रूज कंट्रोल
सुरक्षा फिचर्स
- एअरबॅग
- लेन डिपार्चर वॉर्निंग
- सीट बेल्ट रिमायंडर
- आयएसओएफआयएक्स
- चाईल्ड सीट माउंट्स
- ऑटोनॉमस इमर्जेंसी ब्रेकिंग सिस्टम
यासारखे सेफ्टी फीचर असतील.