मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाखो मुंबईकरांना दिलासा देणारी मोठी घोषणा केली आहे. मुंबईतील लोकलबाबत त्यांनी निर्णय घेतला आहे. येत्या स्वातंत्र्य दिनापासून म्हणजेच १५ ऑगस्टपासून मुंबईकरांना लोकल प्रवासाचं स्वातंत्र्य मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊन १४ दिवस उलटलेल्यांना लोकल प्रवास करता येईल. सध्या अशा मुंबईकरांची संख्या १९ लाख आहे. रोजच ही संख्या वाढत जाणार आहे. पुढील टप्प्यात आणखी शिथील करण्यात येण्याची शक्यता आहे.
मुंबईकरांना कसा करता येईल लोकल प्रवास?
- मुख्यमंत्र्यांची मोठा दिलासा देणारी घोषणा
- अर्थचक्र सुरु ठेवण्यासाठी काही निकष आणि निर्बंध लावून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवाशांना लोकलचा प्रवास करण्यास आपण मान्यता देत आहोत.
- ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले घेऊन १४ दिवस झाले असतील त्यांना १५ ऑगस्ट पासून लोकलमधून प्रवास करता येईल.
लोकल प्रवासासाठी कशी कराल नोंदणी?
- ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत असे प्रवासी मोबाईल अॅपच्या माध्यमातून नोंदणी करू शकतील.
- ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, असे प्रवासी शहरातील पालिकेची प्रभाग कार्यालयांमध्ये नोंदणी करावी लागेल.
- उपनगरीय रेल्वे स्थानकांवरून फोटो पासेस घेऊ शकतील.
- सर्वात महत्वाचं म्हणजे, लोकल प्रवासाच्या या पासेसवर क्यू आर कोड असतील जेणेकरून रेल्वे प्रशासनाला त्याची सत्यता पडताळता येईल.
- मी आपणास विनंती करतो, की कुणीही अवैधरित्या, बेकायदेशीररित्या पासेस प्राप्त करून घेऊ नयेत.
- लसींचे दोन डोसेस घ्यावेत व प्रवास करावा.