मुक्तपीठ टीम
सुरक्षा परिषदेत भारताच्या अध्यक्षतेखाली शनिवारी अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती, मात्र या बैकीत पाकिस्तानला आंमत्रित करण्यात आलं नव्हतं,म्हणून पाकने नाराजी व्यक्त केली आहे. या व्यासपीठाचा वापर स्वतःविरोधात खोटा प्रचार करण्यासाठी केला जात असल्याचा आरोप पाकने केला आहे. पाक हा अफगाणिस्तानचा सर्वात जवळचा शेजारी देश मानला जातो,मात्र युद्धग्रस्त देशाच्या परिस्थितीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीला आमंत्रित न केल्यामुळे पाकने शनिवारी खंत व्यक्त केली आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने (एफओ) एका निवेदनात म्हटले आहे की, संयुक्त राष्ट्रांच्या मंचाचा वापर पाकविरोधात खोटं पसरवण्यासाठी केला जात आहे, तर पाकला त्यांच मत मांडण्याची संधीही देण्यात आली नाही. ऑगस्ट महिन्यासाठी, यूएनएससी अध्यक्ष भारताच्या नेतृत्वाखाली १५ देशांच्या शक्तिशाली सुरक्षा परिषदेने शुक्रवारी अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी एक बैठक आयोजित केली, ज्यामध्ये पाकिस्तानला आमंत्रित केले गेले नाही.
संयुक्त राष्ट्रातील अफगाणिस्तानचे राजदूत गुलाम इसाकझाई यांनी सुरक्षा परिषदेला सांगितले की तालिबानला पाकिस्तानकडून सुरक्षित आश्रयस्थान, युद्ध यंत्रसामग्रीचा पुरवठा आणि अन्न पुरवठा मिळत आहेत. या आरोपांवर प्रतिउत्तर देताना एफओने सांगितले की, “पाकिस्तानने सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षांना विनंती केली होती की, त्यांना परिषदेच्या अधिवेशनाला संबोधित करण्याची आणि अफगाण शांतता प्रक्रियेवर आपले मत मांडण्याची संधी द्यावी, पण ते स्वीकारले नाही.” त्याऐवजी, या व्यासपीठाचा वापर पाकिस्तानविरुद्ध खोटं पसरवण्यासाठी केला.