Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जे ठरवलं ते नीरज चोप्रानं करून दाखवलं! चार वर्षांपूर्वीचं ‘ते’ ट्वीट…

ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं सुवर्ण पदक!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
neeraj chopra

मुक्तपीठ टीम

टोकियो ऑलिम्पिकमधील आजचा दिवस भारतीयांसाठी सुवर्णोत्सवी असल्याचं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कारण भारताच्या पदकांच्या यादीत पहिल्या सुवर्ण पदकाची नोंद झाली आहे. भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्राने भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले आहे. नीरजने ८७.८८ मीटर भाला फेकत सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. नीरजच्या या सुवर्ण कामगिरीनंतर ट्विटरवर चर्चा सुरु झाली ती १५ नोव्हेंबर २०१७ म्हणजे जवळपास चार वर्षांपूर्वी त्याने केलेल्या एका ट्वीटची.

 

चार वर्षांपूर्वीचा ट्वीट संकल्प, आज प्रत्यक्षात!

  • “जब सफलता की ख्वाहीश आपको सोने ना दे, जब मेहनत के अलावा और कुछ अच्छा ना लगे, जब लगातार काम करने के बाद थकावट ना हो, समझ लेना सफलता का नया इतिहास रचनेवाला है!”
  • हे ट्वीट केले होते नीरज चोप्राने. १५ नोव्हेंबर २०१७ म्हणजे जवळपास चार वर्षांपूर्वी!
  • त्या संकल्पाप्रमाणेच तो अथक, सतत, अविरत परिश्रम करत राहिला आणि आज त्याने जे सांगितलं ते करून दाखवलं…भारतासाठी सुवर्ण पदक मिळवलं!

 

pic.twitter.com/wxwKoK6SiO

— Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) November 15, 2017

 

नीरजची सुवर्ण कामगिरी

  • नीरजने पहिल्या थ्रोमध्ये ८७.०३ मीटर लांब भाला फेक करत आघाडी मिळवली होती.
  • तर दुसऱ्या थ्रो ८७.५८ मीटर लांब भाला फेक करत आपले पहिले स्थान कायम ठेवले.
  • तिसऱ्या थ्रो त्यांनी ७६.७९ मीटर लांब केला.
  • चौथा आणि पाचवा थ्रो फाऊल ठरले.
  • त्यानंतर सहाव्या थ्रोमध्ये नीरजने ८४ मीटर भाला फेकला.
  • हा थ्रो निर्णायक ठरत नीरजने देशासाठी सुवर्ण पदकाची कमाई केली.

 

पानिपतचा वीर, जे ठरवलं तेच केलं!

  • खेळाडू नीरज चोप्रा हा हरियाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यातील खांद्रा गावात राहणारा आहे.
  • नीरजचा जन्म एका शेतकरी कुटुंबात २४ डिसेंबला झाला.
  • भालाफेक या खेळाची कोणतीही पार्श्वभूमी त्याच्या गावात नव्हती.
  • सुरुवातीच्या काळात नीरज चोप्रा क्रिकेट खेळत होता.
  • मात्र, त्यानंतर भालाफेक खेळामध्ये अथक प्रयत्नाने नीरजने गुणवत्ता प्राप्त केली.
  • नीरज चोप्रानं मार्च २०२१ मध्ये पटियालाच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्समध्ये ८८.०७ मीटर इतक्या अंतरावर भाला फेकला होता.
  • २०१८च्या आशियाई खेळांमध्ये नीरज चोप्राने सुवर्णपदक मिळवलं होतं. त्यावेळी नीरजने ८८.०६ मीटर भाला फेकला होता.
  • तर आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्यांनी सुवर्ण पदकाची कमाई केली आहे.

 

६ कोटींचं बक्षीस!

  • नीरज चोप्रा भारताला सुवर्ण पदक मिळवून देण्यात यशस्वी ठरला.
  • त्याच्या या यशाला लक्षात घेत हरिणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी नीरज चोप्राचे अभिनंदन केले.
  • यासोबतच हरियाणा सरकारच्या वतीने त्याला ६ कोटींचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
  • तसेच नीरज चोप्राची इच्छा असल्यास त्याला क्लास वन दर्जाची नोकरी देऊ अशी हरियाणा सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे.

Tags: Hariyanaindia won goldneeraj chopraTokyo Olympicsटोकियो ऑलिम्पिकनीरज चोप्राभालाफेकमुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर
Previous Post

आता बेस्टच्या ताफ्यातही इलेक्ट्रिक बस!

Next Post

‘मिठी’ ला नदीचे मूळ स्वरूप प्राप्त करून देणार: पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

Next Post
mithi river

'मिठी' ला नदीचे मूळ स्वरूप प्राप्त करून देणार: पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!