मुक्तपीठ टीम
मुंबईत कोरोनाचे निर्बंध शिथील झाले असले तरी लोकल बंद आहे. खासगी कार्यालयाना १०० टक्के क्षमतेनं सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे, मात्र नोकरदार वर्ग कार्यालयात कसा पोहोचणार असा प्रश्न उद्भवला आहे. त्यामुळे किमान लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी सर्वच स्तरांतून होत आहे. लोकल सेवा सुरु करण्याच्या मागणीसाठी कांदिवलीमध्ये भाजपा आमदार अतुल भातखळकरांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
शेकडो भाजपा कार्यकर्त्यांसह आमदार भातखळकरांनी सरकारविरोधातील घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. राज्यातील आघाडी सरकारचे धोरण हे सर्वसामान्यांच्याविरोधातील आहे. निर्बंधांमध्ये शिथीलता दिली, पण कामावर जायचं कसं, ती तुमची जबाबदारी, असे बेजबाबदारपणाचे धोरण आघाडी सरकारने राबवल्याचा आरोप भाजपा नेत्यांनी केला आहे.
लोकल प्रवास नाकारणारे हे तर जनविरोधी ठाकरे सरकार. लोकांची परवड करणाऱ्या या सरकारचा धिक्कार असो… pic.twitter.com/gwQfIWRKzR
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 6, 2021
या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी मोठ्याप्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आल्याचे दिसत आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते महाराष्ट्र सरकार विरोधात शुक्रवारी मुंबईच्या विविध रेल्वे स्थानकांवर आंदोलन करण्यात आले.
कोविडचे दोन डोस घेतलेल्या लोकांना लोकल प्रवास करण्याची मुभा द्यावी या मागणीला सातत्याने वाटाण्याच्या अक्षता लावणाऱ्या ठाकरे सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही आज तीव्र आंदोलन केले. नोकरीवर जाण्यासाठी लोकल अनिवार्य आहे. सरकार जगण्याचा, रोजगाराचा हक्क हिरावून घेऊ शकत नाही. pic.twitter.com/jT75aIO30M
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 6, 2021
भाजपाचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न ठाकरे सरकारने करू नये! – भातखळकर
- जनतेचा हा उद्रेक रोखण्याची ताकद या सरकारमध्ये नाही.
- कोरोनाचे दोन डोस घेतलेल्या लोकांना लोकल प्रवास करण्याची मुभा द्यावी या मागणीला सातत्याने वाटाण्याच्या अक्षता लावणाऱ्या ठाकरे सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही आज तीव्र आंदोलन केले. नोकरीवर जाण्यासाठी लोकल अनिवार्य आहे. सरकार जगण्याचा, रोजगाराचा हक्क हिरावून घेऊ शकत नाही.
- याचना नही अब रण होगा, संघर्ष बडा भीषण होगा… ये ठाकरे सरकार को हमारी चेतावनी है.
- जनेतेला रोजगारासाठी आवश्यक असणारी लोकल सेवा पुन्हा त्यांच्या वापरासाठी उपलब्ध करा, त्यांना प्रवासाचा अधिकार द्या, तोपर्यंत आम्ही सरकारला स्वस्थ बसू देणार नाही.
- भाजपाचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न ठाकरे सरकारने करू नये, जनतेचा हा उद्रेक रोखण्याची ताकद या सरकारमध्ये नाही.
- लोकल प्रवासाची परवानगी न देणारे ठाकरे सरकार हे बेपर्वा, तुघलकी आणि फॅसिस्ट सरकार आहे.
- लोकल प्रवास नाकारणारे हे तर जनविरोधी ठाकरे सरकार. लोकांची परवड करणाऱ्या या सरकारचा धिक्कार असो.
- टक्केवारीमुळे पोट तट्ट भरलेले ठाकरे सरकार लोकांच्या उपासमारीबाबत, उपजीविकेबाबत उदासीन आहे. लोकल प्रवासासाठी आम्ही आंदोलन छेडले या सरकारला जागवण्यासाठी.