मुक्तपीठ टीम
कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी मोदी सरकारने आरोग्य विमा जाहीर केला आहे. केंद्र सरकारच्या घोषणेनुसार, कोरोना विषाणू (कोविड -19) साथीमुळे अनाथ झालेल्या १८ वर्षांपर्यंतच्या मुलांना ५ लाख रुपयांचा मोफत आरोग्य विमा दिला जाईल. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर याची घोषणा करताना म्हणाले की, या विम्याचा प्रीमियम पीएम केअर फंड मधून दिला जाईल.
अनुराग ठाकूर यांनी भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्राने उचललेल्या या पावलांची माहिती दिली आहे. सरकारी संकेतस्थळाच्या लिंकसह या योजनेचा तपशील त्यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. आयुष्मान भारत ही सरकारची प्रमुख योजना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल २०१८ मध्ये आरोग्य आणि वेलनेस सेंटर (HWCs) आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) या दोन स्तंभांसह सुरू केली होती.
अनाथ मुलांसाठी केंद्राची मदत
• मुलांसाठी पीएम केअर योजना २९ मे २०१९ रोजी पंतप्रधान मोदींनी सुरु केली.
• कोरोनामुळे ज्या बालकांनी आपल्या आई-वडिलांना, कायदेशीर पालकांना किंवा दत्तक पालकांना गमावले आहे, त्या बालकांना पाठिंबा देण्याचा हेतू आहे.
• अनाथ झालेल्या१८ वर्षांपर्यंतच्या मुलांना ५ लाख रुपयांचा मोफत आरोग्य विमा दिला जाईल.
• हा विमा पीएम केअर फंडमधून दिला जाईल.
• केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्वीट करून ही माहिती दिली.