Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“पंतप्रधान नरेंद्र मोदी भूषवणार संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद, भारतासाठी अभिमानास्पद बाब”

भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचे प्रतिपादन

August 4, 2021
in घडलं-बिघडलं
0
madhav bhandari- pm modi

मुक्तपीठ टीम

‘स्वतंत्र भारताच्या आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या इतिहासात देखील पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे (UNSC) अध्यक्षस्थान भूषवत आहेत, हा संपूर्ण भारतासाठी अभिमानाचा प्रसंग आहे’ असे प्रतिपादन महाराष्ट्र भाजपाचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी केले आहे.

 

९ ऑगस्ट रोजी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेत “सागरी सुरक्षा” ह्या विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चसत्राचे आयोजन करण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या चर्चासत्राचे अध्यक्ष आहेत. १९४५ साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थापनेनंतर आणि स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधान हे सुरक्षा परिषेदच्या चर्चसत्राचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत; हे स्पष्ट करून ‘हा भारतासाठी मोठा जागतिक सन्मान असून यातून भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावाचे दर्शन होते तसेच भारत गेल्या काही वर्षांपासून सुरक्षा परिषदेच्या कायम सदस्यत्वासाठी प्रयत्नशील आहे; त्यादृष्टीने देखील हे महत्वाचे पाऊल आहे’ असेही भांडारी ह्यांनी म्हटले आहे.

 

‘गेल्या दोन वर्षात सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्यत्व, विश्व आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्षपद, G 7 राष्ट्रांच्या बैठकीचे निमंत्रण, क्वाड या संघटनेत महत्वाचे स्थान आणि आता सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद असे मोठे जागतिक सन्मान भारताला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात मिळाले आहेत’ ह्याचा उल्लेख करून माधव भांडारी ह्यांनी म्हटले आहे की ‘आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या तयारीत सारा देश असताना हा बहुमान भारताला मिळणे ह्याला सांकेतिक महत्व आहे.’

 

ही परिषद ‘सागरी सुरक्षा’ ह्या विषयावर आयोजित केलेली असून अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स आणि चीन ह्या बड्या देशांबरोबर अन्य दहा सदस्य देश ह्या परिषदेत सहभागी आहेत. ‘ह्या परिषदेत चीनच्या उपस्थितीत ‘सागरी सुरक्षा’ ह्या विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चा घडवून आणणे हे भारतासाठी मोठे यश आहे’ असे नमूद करून माधव भांडारी ह्यांनी म्हटले आहे की, ‘चीनबरोबर आपला आणि जगातल्या बहुतेक देशांचा काही ना काही संघर्ष सुरु आहे. आपल्या सागरी सीमांची सुरक्षा व जागतिक पातळीवर भारतीय सागरांची सुरक्षा हा त्यात कळीचा मुद्दा बनलेला आहे. केवळ भारतच नाहीतर अन्य अनेक देश ही चीनच्या सागरी आक्रमणाबद्दल सजग आहेत, असे असताना ह्या मुद्द्यावर जागतिक चर्चा घडवून आणून त्यावर काही जागतिक सहमत घडवण्याचा प्रयत्न भारत ह्या निमित्ताने करत आहे. ह्या सगळ्या घटनेला दूरगामी ऐतिहासिक महत्व असून पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या नेतृत्व कौशल्याचा हा भाग देशाच्या दृष्टीने कमालीचा महत्वाचा असून आपल्यासाठी अभिमानाचा आहे’ असेही भांडारी ह्यांनी स्पष्ट केले आहे.

 


Tags: BJPmadhav bhandariprime minister narendra modiUNSCपंतप्रधान नरेंद्र मोदीमाधव भांडारीसंयुक्त राष्ट्र संघटनासागरी सुरक्षा
Previous Post

क्यू-आर कोड लावणार पोलिसांची हजेरी, आता गस्तीवरील पोलिसांना ठरवलेल्या ठिकाणी जावंच लागणार!

Next Post

आरबीआय अलर्ट: जुन्या नोटा बदलण्याच्या किंवा खरेदीच्या नावावर फसवणूक!

Next Post
RBI

आरबीआय अलर्ट: जुन्या नोटा बदलण्याच्या किंवा खरेदीच्या नावावर फसवणूक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!