मुक्तपीठ टीम
वाढती गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांवर वचक बसवण्यासाठी नागपूर पोलिसांनी क्यूआर कोड सिस्टीम सुरु केली आहे. चोरी, मारामारी, अपघात अथवा कोणताही छोटामोठा गुन्हा घडणाऱ्या भागात पोलिसांनी क्यूआर कोड लावले आहेत. पोलिसांना क्यूआर कोड स्कॅन करून नेमून दिलेल्या परिसरात जावंच लागणार आहे. परिणामी पोलिसांचा संवेदनशील भागात सतत वावर असेल.
अशी राबविली जाणार ही सिस्टम
- शहरातील गुन्हेगारी नियंत्रित करण्यात यावी यासाठी पोलिसांनी नवीन योजना आखली आहे.
- नागपूर शहरात पेट्रोलिंगसाठी चार्ली आणि बिट मार्शल आहेत.
- यांच्यावर दिलेल्या परिसरात सतत पेट्रोलिंग करून गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासोबतच गुन्हेगारी संपवीण्याची जबाबदारी आहे.
- ज्या ठिकाणी गुन्ह्यांचे प्रमाण जास्त आहे, अशी शहरातील १५०० ठिकाणं पोलिसांनी शोधली आहेत.
- या सर्व ठिकाणांवर नेमून दिलेल्या बिट मार्शल आणि चार्ली पोलिसांना जायचं आहे.
- पोलिसांना क्यूआर कोड स्कॅन करावा लागणार.
- म्हणजेच पोलिसांना नेमून दिलेल्या परिसरात जावंच लागणार.
- स्कॅन करताच नेमून दिलेल्या ठिकाणी पोलीस पोहोचला आहे, याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळणार आहे.
- परिणामी पोलिसांचा संवेदनशील भागात सतत वावर असेल.