Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ऑलिंपिकमध्ये बॉक्सिंगचं कांस्यपदक जिंकणाऱ्या लव्हलिनचे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून अभिनंदन

August 4, 2021
in घडलं-बिघडलं
0
Lovlina borgohain

मुक्तपीठ टीम

टोकियो ऑलिंपिकमध्ये महिला बॉक्सिंग स्पर्धेचं कांस्यपदक जिंकणाऱ्या लव्हलिन बोर्गोहेन हिचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. “तुर्कीच्या विश्वविजेत्या बुसेनाज सुरमेनेलीन हिच्याविरुद्ध लव्हलिन जिंकली नसली तरी तिनं देशवासियाचं मन जिंकलं आहे. टोकियो आलिंपिकमध्ये देशाला तिसरं पदक जिंकून देत तिने देशाचा गौरव, देशवासियांचा आनंद बहुगुणीत केला आहे. लव्हलिननं जिंकलेल्या कांस्यपदकाचं मोल सुवर्णपदकापेक्षा कमी नाही. मुष्ठीयुद्धाचा गौरवशाली इतिहासात असलेल्या भारतात लव्हलिनच्या यशापासून प्रेरणा घेऊन अनेक मुली पुढे येतील. देशाचा गौरव वाढवतील”, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लव्हलिनेचे कौतुक केलं असून भविष्यातील उज्ज्वल यशासाठी तिला शुभेच्छा देल्या आहेत.

 

टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सिंग स्पर्धेचं कांस्यपदक जिंकणाऱ्या लव्हलिना बोर्गोहेन हिचं मनःपूर्वक अभिनंदन! टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाला तिसरं पदक जिंकून देत तिनं देशाचा गौरव, देशवासियांचा आनंद बहुगुणीत केला आहे. लव्हलिनानं जिंकलेल्या कांस्यपदकाचं मोल सुवर्णपदकापेक्षा कमी नाही. pic.twitter.com/g2DoVIy4hz

— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) August 4, 2021

 

उपमुख्यमंत्री अभिनंदनपर संदेशात म्हणतात की, लव्हलिन बोर्गोहेननं ऑलिंपिक बॉक्सिंगच्या ६९ किलो वजनी गटातलं ऑलिंपिकपदक आधीच निश्चित केलं होतं. उपान्त्यफेरीत विश्वविजेत्या बुसेनाज सुरमेनेलीनकडून पराभव पत्करावा लागला तरी, तिनं कडवी झुंज दिली. तीच्या मेहनतीचा, यशाचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. लव्हलिननं जिंकलेले ऑलिंपिक पदक भारतीय बॉक्सिंगचा नवी ऊर्जा, प्रेरणा देईल. विजेंदरसिंगनं २००८ मध्ये, मेरी कोम हिनं २०१२ मध्ये जिंकलेल्या बॉक्सिंगच्या ऑलिंपिक पदकांनंतर देशासाठीचं तिसरं ऑलिंपिक पदक जिंकून लव्हलिननं इतिहास घडवला आहे. लव्हलिनच्या यशाचा महाराष्ट्राला, देशाला अभिमान असल्याचंही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हटलं आहे.


Tags: boxingbronze medalDeputy Chief Minister Ajit PawarTokyo Olympicsउपमुख्यमंत्री अजित पवारटोकियो ऑलिंपिकलव्हलिन बोर्गोहेन
Previous Post

तलवार घेऊन न्यूज चॅनल कार्यालयात तरुण घुसला, प्रचंड तोडफोड

Next Post

“खावाले काळ, नी भूईले भार म्हणजे ठाकरे सरकार”

Next Post
ashish shelar

"खावाले काळ, नी भूईले भार म्हणजे ठाकरे सरकार"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!