Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ओएनजीसी बार्ज बुडाल्याच्या चौकशीसाठी सरकारची उच्च स्तरीय समिती

अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ओएनजीसीने केल्या उपाययोजना

August 3, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
ONGC

मुक्तपीठ टीम

तौक्ते वादळामुळे ओएनजीसी अर्थात तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाच्या प्रकल्पांच्या कामासाठी नेमण्यात आलेली बार्ज बुडाल्यामुळे एकूण ८६ कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे त्या दुर्घटनेची गंभीर दखल घेत सरकारने उच्च स्तरीय चौकशी समिती नियुक्त केल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

 

तौक्ते वादळ आलेले असताना ओएनजीसीने समुद्रात कर्तव्यावर असणाऱ्या बार्ज P-305 सह सर्व जहाजांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यास सांगितले होते. बार्ज P-305 ने देखील त्यानुसार हालचाली करत असल्याची माहिती दिली होती, बार्ज आणि त्यावरील सर्वांची सुरक्षितता लक्षात घेऊन बार्ज प्रमुखाने जवळच्या सुरक्षित स्थळी बार्ज नेण्याचा निर्णय घेतला. मात्र, बार्जच्या नांगरांचे कार्य बिघडल्यामुळे बार्ज एकाच जागी अडकून पडला आणि शेवटी बुडाला.

 

बार्जचे अडकून पडणे आणि बुडणे याला कारणीभूत घटनाक्रमाची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने खालील सदस्यांचा समावेश असलेली उच्चस्तरीय समिती स्थापन केली:

 

बार्ज बुडाल्याच्या चौकशीसाठी समिती

  • नौवहन विभागाचे महासंचालक अमिताभ कुमार
  • हायड्रोकार्बन महासंचालनालयाचे महासंचालक एससीएल दास
  • केंद्रीय संरक्षण मंत्रालयाचे सहसचिव नझ्ली जाफरी शायीन

 

वरील समितीशिवाय, जहाजांना नियुक्त करण्यासंदर्भातील नियम आणि अटी यांच्या सुधारणांबाबत विचार करण्यासाठी आणि गरज असल्यास त्यात सुधारणा करण्यासाठी नौवहन विभागाचे महासंचालक आणि केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे (अन्वेषण) अतिरिक्त सचिव यांचा समावेश असलेली दोन सदस्यांची समिती देखील स्थापन करण्यात आली.

 

अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ओएनजीसीने देखील खालील उपाययोजना केल्या आहेत:

  • भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या महासंचालकांसोबत चर्चा करून समुद्रातील ओएनजीसीच्या विशिष्ट स्थानांकरिता हवामान अंदाज पुरविण्याची सोय सागरी कार्यान्वयनादरम्यान, जहाजांची माहिती, व्यवस्थापन आणि सुरक्षिततेसाठी सागरी कक्ष नामक एककेन्द्री अधिकारी कक्षाची निर्मिती
  • भयानक चक्रीवादळाच्या आपत्तीत तात्काळ प्रतिसाद देऊन परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी प्रमाणित परिचालन पद्धती (SOP), तात्काळ प्रतिसाद योजना (ERP), आपत्कालीन व्यवस्थापन योजना (DMP) यांची उजळणी
  • आंतरराष्ट्रीय नावलौकिक असलेल्या सल्लागाराच्या माध्यमातून आरोग्य, सुरक्षा आणि पर्यावरणीय प्रक्रियांचे मापदंड निश्चितीकरण

Tags: high level govt committeeONGC bargerameshwar teliओएनजीसी बार्जकेंद्र सरकारचक्रीवादळतौक्ते वादळरामेश्वर तेली
Previous Post

आदिवासी विद्यार्थ्यांना आवाहन, एकलव्य मॉडेल निवासी शाळेत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करा!

Next Post

मराठा विद्यार्थ्यांसाठी १४ वसतीगृहे सज्ज, लवकरच उद्घाटने

Next Post
Ashok chavan

मराठा विद्यार्थ्यांसाठी १४ वसतीगृहे सज्ज, लवकरच उद्घाटने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!