मुक्तपीठ टीम
“जगात जर्मनी भारतात परभणी” असे प्रत्येक परभणीकर अभिमानानं ठणकावून सांगतो. तर ही परभणी आता चर्चेत आहे ती पेट्रोलचे दर सर्वात जास्त असल्यामुळे!
परभणीमध्ये बुधवारी पेट्रोलचे दर ९४.१६ वर पोहोचले होते. हा दर सगळ्यात जास्त आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोलचे दर ९२.९८ प्रति लीटर होते तर जालनामध्ये हे दर ९२.७८ प्रति लिटर एवढे होते. सध्या पेट्रोलचे दर हे सगळ्यात जास्त आहेत.
परभणी जिल्ह्यातील किरकोळ पेट्रोल विक्रेत्यांना तीन वेगवेगळ्या पेट्रोल डेपोंमधून पेट्रोल पुरवठा होतो. मनमाड, सोलापूर, आणि अकोला जे परभणीपासून खूप अंतरावर आहेत. किमान २०० ते ३५० किमी अंतरावरून परभणीला इंधन पुरवठा होतो. स्वाभाविकच वाहतूक खर्च जास्त होत असल्याने मुल्यावर परिणाम होतो.
जबर कर, सरकारने लादलेली कामे, पेट्रोल वाहतुकीतील जास्त अंतर या सगळ्याचा थेट परिणाम पेट्रोलच्या दरावर होतो.