मुक्तपीठ टीम
अश्वगंधापासून तयार केलेल्या आयुर्वेदिक औषधांमुळे पोस्ट आणि लाँग कोरोना रुग्णांना फायदा होण्याविषयी भारतात अभ्यास केला जात आहे. त्यात याचा खूप फायदा झाला असल्याचे म्हटले जाते. भारतात यश मिळाल्यानंतर आता पहिल्यांदाच देशाबाहेर अश्वगंधाचा कोरोना रुग्णांवर अभ्यास केला जाणार आहे. यासाठी भारत आणि ब्रिटनमध्ये एक करार करण्यात आला आहे.
आयुष मंत्रालयाची अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था आणि ब्रिटनच्या लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिन या संस्था अश्वगंधावर काम करत आहेत. ब्रिटनमधील तीन शहरांमध्ये पोस्ट कोरोना रुग्णांवर या औषधाचा अभ्यास केला जाणार आहे.
अश्वगंधाच्या कोरोना रुग्णांवरील परिणामावर अभ्यास
- पुढील ९० दिवसात, लिसेस्टर, बर्मिंघम आणि लंडनमध्ये दोन हजार पोस्ट आणि लाँग कोरोना रुग्णांवर अभ्यास केला जाईल.
- एक हजार रुग्णांचे दोन गट करून अभ्यास केला जाईल.
- दोन्ही गटांचा तुलनात्मक अभ्यास पुढील ९० दिवस केला जाईल.
- अलीकडेच अश्वगंधा भारतातील रुग्णांवरील चाचण्यांमध्ये प्रभावी ठरली आहे. आतापर्यंतच्या अभ्यासातून अश्वगंध ही कोरोनाची दीर्घकालीन लक्षणे कमी करण्यासाठी एक प्रभावी पर्याय असल्याचे दिसून आले आहे.