मुक्तपीठ टीम
गेली अनेक वर्षे चांगल्या आणि दमदार डेटा प्लानच्या बातम्या यायच्या त्या जियो, एअरटेल, फारतर व्होडाफोन-आयडियासारख्या खासगी कंपन्यांच्याच. पण आता सरकारी मालकीच्या बीएसएनएलनेही कात टाकण्यास सुरुवात केली आहे, असे वाटते. सरकारी कंपनीने आता देशातील सर्वच सर्कलसाठी दोन चांगले असे दमदार डेटा प्लान्स लाँच केले आहेत.
सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने सगळ्या टेलिकॉम सर्कल्समध्ये नवीन दोन अल्ट्रा फास्ट अनलिमिटेड फायबर ब्रॉडबँड प्लान्स लॉन्च केले आहेत.
बीएसएनएलची नवीन ‘भारत एयर फायबर’
• या एअर फायबरचे हे ‘एयरफायबर अल्ट्रा’ आणि ‘एयरफायबर अल्ट्रा प्लस’ हे दोन नवे प्लान्स आहेत.
• हे दोन नवीन एयर फायबर प्लान्स जास्तीत जास्त ८०एमबीपीएस डाउनलोड स्पीड देतील.
• ते वन फ्री स्टेटिक आयपी एड्रेस सोबत लॉन्च होतील.
• बीएसएनएलच्या कोणत्याही अतिरिक्त शुल्काविना ‘एयरफाइबर अल्ट्रा’ आणि ‘एयरफाइबर अल्ट्रा प्लस’ प्लान सोबत कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलची सुविधा देत आहे.
• या दोन प्लान्सचे १२ महिन्यांचे शुल्क आगाऊ भरल्यानंतर १ महिना मोफक सेवा पुरवली जाईल.
बीएसएनएल एयर फायबर अल्ट्रा प्लान
• बीएसएनएलचे एयरफायबर अल्ट्रा प्लानमध्ये डाउनलोड स्पीड ८० एमबीपीएस आहे.
• या प्लान सोबत ग्राहकांना ५०००जीबी डेटा जो एक महिन्यासाठी व्हॅलिड आहे.
• डेटा लिमिट ओलांडल्यानंतर स्पीड कमी होऊन १५ एमबीपीएस पर्यंत राहील. या प्लानची किंमत २९९५ रुपये आहे.
बीएसएनएल एयर फायबर अल्ट्रा प्लस प्लान
• बीएसएनएल एयर फायबर अल्ट्रा प्लसच्या प्लानसोबत ८० एमबीपीएस स्पीड आहे.
• सोबत ७५०० जीबी हाय स्पीड डेटा दिला जात आहे.
• डेटा लिमिट संपल्यानंतर डाउनलोड स्पीड २५ एमबीपीएस होईल.
• एफयूपी लिमिट पार केल्यानंतर ग्राहक अनलिमिटेड ब्रॉडबँड इंटरनेटचां आनंद घेऊ शकतात.
• अल्ट्रा प्लस प्लानची किंमत ६९९५ रुपये आहे.
बीएसएनएल एयर फायबरसाठी कसा कराल अर्ज
• बीएसएनएल एयर फायबरसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्थानिक बीएसएनएल टेलिफोन एक्सचेंज किंवा बीएसएनएल ग्राहक सेवा केंद्र (बीएसएनएल सीएससी) येथे संपर्क करावा लागेल.
• जर तुमच्या विभागात एयर फायबर सेवा उपलब्ध आहे, तर तुम्ही एक ॲप्लिकेशन फॉर्म भरून आयडी प्रूफ आणि एड्रेस प्रूफची कॉपी,पासपोर्ट साइज फोटोसोबत फॉर्म जमा करा.
• बीएसएनएलच्या एयर फाइबर फ्रँचाइजीद्वारे कवरेज / फिजिबिलिटीची तपासणी केल्यानंतर कनेक्शन दिले जाईल.