मुक्तपीठ टीम
बालपणापासून ते अगदी वृद्धापकाळापर्यंत प्रत्येक पिढीचं पिढ्यानं पिढ्या आवडतं ठरलेलं पार्ले-जी बनवणारी पार्ले प्रोडक्ट्स देशातील एफएमसीजी क्षेत्रातील नंबर १चा ब्रँड ठरला आहे. ग्लुकोज बिस्किटांमध्ये तीच चव, तोच दर्जा दशकानुदशकं कायम राखलेल्या पार्लेनं इतर उत्पादनांमध्येही तशीच झेप घेतलीय. त्यामुळे पार्ले प्रोडक्ट्स देशात ‘फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स’ (FMCG) कंपनीमध्ये आघाडीवरील ब्रँड म्हणून ठरला आला आहे.
कंटारच्या अहवालानुसार पार्ले आघाडीवर!
• मार्केटिंग रिसर्च फर्म कंटारच्या ब्रँड फूटप्रिंट अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
• कन्झ्युमर रिच पॉइंट्स (CRPS) वर आधारित सर्वात निवडक एफएमसीजी ब्रँड म्हणून पार्ले प्रोडक्ट्स यंदाच्या क्रमवारीत आघाडीवर आहे.
• सीआरपी ग्राहकांनी केलेल्या वास्तविक खरेदी आणि कॅलेंडर वर्षात या खरेदीची वारंवारता विचारात घेते.
• पार्लेनंतर अमूल, ब्रिटानिया, क्लिनिक प्लस आणि टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स आहेत.
कोरोना साथीच्या रोगामुळे खरेदीवर परिणाम
• त्यामुळे किराणा सामान खरेदी करण्यासाठी केलेला सरासरी प्रवास कमी झाला. पण २०२० मध्ये प्रति प्रवास अधिक खरेदी नोंदली गेली.
• खरेदीची वारंवारता एक टक्क्याने कमी झाली, परंतु प्रति प्रवास खरेदी पाच टक्क्यांनी वाढली.
• यामुळे २०१९ च्या तुलनेत (७२ टक्के) सीआरपीच्या दृष्टीने कमी प्रमाणात ब्रँडची संख्या (५० टक्के) वाढली आहे.
कोरोनामुळे डेटॉल, लाइफबॉयचा फायदा!
• आरोग्य आणि स्वच्छतेसाठी प्रसिद्ध असलेल्या डेटॉलने एका वर्षात आश्चर्यकारकपणे ४८ टक्कयांनी आपली सीआरपी वाढवली आहे आणि पहिल्या २५ ब्रँडच्या यादीत त्यांचा समावेश झाला आहे.
• डेटॉलनंतर लाइफबॉय २५ टक्के सीआरपीने वाढ
• विम २१ टक्के सीआरपी (१४५४ दशलक्ष)
• डाबर १४ टक्के सीआरपी (१४५८ दशलक्ष)
• ब्रिटानिया ११ टक्के सीआरपी (४६९४ दशलक्ष)
एकूण सीआरपी ८६ अब्जांवरून ८९ अब्जांवर गेली आहे. तरी २०१९ मध्ये विकास दर १८ टक्क्यांवरून ४ टक्क्यांवर आला आहे.