मुक्तपीठ टीम
ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लिमिटेडमध्ये हॅन्डीमन/ लोडर या पदासाठी ७५ जागा, सुपरवाइजर या पदासाठी २१ जागा, सिनियर सुपरवाइजर या पदासाठी ३ जागा अशा एकूण ९९ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ८ ऑगस्ट २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- १) ८वी उत्तीर्ण २) कार्गो हॅन्डलिंगमध्ये १ वर्ष अनुभव
२) पद क्र.२- १) पदवीधर २) कार्गो इंडस्ट्रीमध्ये १ वर्ष अनुभव
३) पद क्र.३- १) पदवीधर २) कार्गो इंडस्ट्रीमध्ये २ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ४५ वर्षांपर्यंत असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ७०० रूपये शुल्क आकारले जाईल. तर, एससी/ एसटी/ पीएच/ इडब्ल्यूएस उमेदवारांकडून ४५० रूपये शुल्क आकारले जाईल.
अधिक माहितीसाठी बेसिलच्या अधिकृत वेबसाइट https://www.becil.com/ वरून माहिती मिळवू शकता.