मुक्तपीठ टीम
न्यूज चॅनेलवरील चर्चेचे कार्यक्रम हे राजकीय नेत्यांच्या डायलॉगबाजींमुळे मनोरंजक ठरतात. ‘आज तक’ न्यूज चॅनेलच्या हल्ला बोल कार्यक्रमात संबित पात्रा यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘हम ट्रॅक्टर से नहीं, अॅक्टर से डरते है’ असा टोला संबित पात्रा यांनी राहुल गांधीवर लगावला आहे.
कृषी कायद्यांतर्गत गेले ७ महिने देशभरात अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. संयुक्त कृषी आंदोलनाचे नेते राकेश टिकेत यांनी सांगितले की, ज्याप्रकारे दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी कृषी कायद्यासाठी आंदोलने होत आहेत तसेच उत्तरप्रदेशाची राजधानी लखनऊमध्येसुद्धा अनेक शेतकरी आंदोलनासाठी सज्ज आहेत. आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे ते म्हणाले. यामुद्द्यावर बोलत असताना संबित पात्रा यांनी राहुल गांधीवर निशाणा साधला आहे.
आज तकच्या कार्यक्रमात सुत्रसंचालक अंजना ओम कश्यप यांनी संबित पात्रा यांना प्रश्न विचारला की, पुढील एक महिन्यात सरकार निर्णय घेईल. पण यावर उपाय तुम्हालाच शोधायचा आहे. यावर उत्तर देताना ते म्हणाले, मी त्यांची पत्रकार परिषद ऐकली. ते पत्रकार परिषदेत असे म्हणाले की, आम्ही दिल्लीला लखनऊ बनवू. मात्र मला असे वाटते की असे करुन तुम्ही कसे काय लखनऊला दिल्ली बनवू शकाल? असे ते म्हणाले.
संबित पात्रा म्हणाले, लोकतांत्रिक देशात आंदोलने करणे हे चुकीचे नाही परंतु, घेराव करुन लखनऊला दिल्ली बनवणे हे योग्य नाही. ट्रॅक्टरची भीती नाही वाटत कारण ते शस्त्र आहे परंतु, ट्रॅक्टरवर बसणाऱ्या अॅक्टरची भीती वाटते. त्या अॅक्टरची भीती वाटते जे ट्रॅक्टर न चालवता अॅक्टरची बदनामी करतात. राहुल गांधीवर निशाणा साधत ते पुढे म्हणाले, तुम्ही प्रथम कॉंग्रेस पुढे चालवा आणि त्यानंतर ट्रॅक्टर चालवा. असे ते म्हणाले.