Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुक्ता बर्वे, उमेश कामत, समीर पाटील आणि ओंकार गोवर्धनांचं थरारनाट्य स्टोरीटेल मराठीवर!

July 26, 2021
in घडलं-बिघडलं
0
61 minutes

मुक्तपीठ टीम

मुक्ता बर्वे आणि उमेश कामत यांची ‘अजूनही बरसात आहे’ ही नवीकोरी मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. आपणही जर या एव्हरग्रीन जोडीचे फॅन असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची, पण तितकीच धक्का देणारी बातमी आहे. उत्तमोत्तम ऑडिओ कन्टेन्ट निर्माण करणाऱ्या ‘स्टोरीटेल मराठी’ या जगविख्यात प्लॅटफॉर्मने खास नव्याने तयार केलेल्या ‘६१ मिनिट्स’ या ओरिजिनल ऑडिओ ड्रामामध्ये मुक्ता आणि उमेश एका वेगळ्याच रूपात आपल्यासमोर येणार आहेत आणि त्यांच्याबरोबरीने असणार आहेत ओंकार गोवर्धन, समीर पाटील आणि रोहित कोकाटे हे कसलेले कलाकार.

 

समजा.. आपण कुठे फिरायला गेलोय, कुटुंबाबरोबर मस्त वेळ घालवतोय, सगळं कसं छान चाललंय म्हणून मनातल्या मनात खुश होतोय, अन् अचानक आपल्याला कोणीतरी किडनॅप केलं.. तर? किडनॅप करून अंधाऱ्या खोलीत डांबलं.. तर?

 

मयूर, निशा, स्वानंद आणि आवारे सर या चौघांनी या ‘तर?’ चा विचार कधी केलाच नव्हता. म्हणूनच ते अश्या खोलीत प्रत्यक्षात सापडल्यानंतर पुरते हबकले आहेत. त्यात त्यांना तिथे कोणी किडनॅप करून आणलंय, त्यामागचं कारण काय, त्या किडनॅपरला हवंय काय हेही कोणी सांगत नाहीये. डोळ्यांत बोट घातलं तरी दिसणार नाही अश्या ठार अंधारात अखेर स्पीकरवरून एक घोषणा दिली जाते, ज्यात त्यांना एक कोडं घातलं जातं, जे त्यांच्याच पूर्वायुष्याशी निगडित आहे. ते सोडवणं हाच त्या चौघांपुढे एकमेव पर्याय उरतो अन् सुरू होतं एक थरारनाट्य..! ते कोडं त्यांना सुटतं का? ६१ मिनिटांचं नक्की काय महत्त्व आहे? त्या चौघांना तिथे का आणलं गेलंय? तो किडनॅपर कोण आहे? त्याला नक्की काय हवंय? या सर्व प्रश्नांची उत्तरं म्हणजेच ‘६१ मिनिट्स’ हा स्टोरीटेल मराठीचा ऑडिओ ड्रामा..!

 

मुक्ता बर्वे हिने यापूर्वी रंगवलेली सर्व पात्रं ही हवीहवीशी, सर्वांना प्रेमात पाडणारी अशी आहेत. उमेश कामत हा तर लाखो तरुणींचा लाडका अभिनेता आहे. ओंकार गोवर्धन याने ‘सावित्री-ज्योती’ या मालिकेत रंगवलेली महात्मा ज्योतिबा फुले यांची भूमिका प्रेक्षकांच्या खास आवडीची ठरलीये. समीर पाटील आपल्याला ‘पोश्टर बॉयज्’, ‘पोश्टर गर्ल’, ‘विकून टाक’ अश्या धमाल विनोदी चित्रपटांचे लेखक-दिग्दर्शक म्हणून परिचित आहेत. पण आपण ‘६१ मिनिट्स’ हा ऑडिओ ड्रामा ऐकाल तेव्हा या सर्व कलाकारांच्या प्रचलित इमेजेस ना धक्का देणाऱ्या भूमिका आपल्याला अनुभवायला मिळतील. या सर्व ताकदीच्या कलाकारांच्या अभिनयक्षमतेला पुरेपूर न्याय देणाऱ्या या भूमिका अन् त्यांच्यातल्या नाट्यातून उलगडणारा सस्पेन्स हा श्रोत्यांना थरारून टाकणारा आहे. ‘कौल’ हा सिनेमा गाजवणाऱ्या रोहित कोकाटेची या ऑडिओ ड्रामामध्ये विशेष भूमिका आहे.

 

‘इप्सिता’, ‘धारणा’, ‘अफेअर’ अश्या लोकप्रिय ठरलेल्या ‘स्टोरीटेल मराठी’च्या ओरिजिनल ऑडिओ सिरीजचा युवा लेखक तुषार गुंजाळ याच्याच लेखणीतून ‘६१ मिनिट्स’ हे थरारनाट्य उतरले आहे. सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर या सुप्रसिद्ध दिग्दर्शक जोडगोळीच्या हाताखाली सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेल्या तुषारनेच या ऑडिओ ड्रामाचे दिग्दर्शनसुद्धा केलेले आहे.

 

‘६१ मिनिट्स’ या ऑडिओ ड्रामाच्या शेवटी जो संदेशवजा अनुभव मिळतो तो सर्वांपर्यंत पोहचणं अत्यंत गरजेचं आहे. तो अनुभव घेण्यासाठी अन् मुक्ता बर्वे, उमेश कामत, ओंकार गोवर्धन, समीर पाटील आणि रोहित कोकाटे या कसलेल्या अभिनेत्यांच्या आवाजातली थरारक जादू अनुभवण्यासाठी ‘६१ मिनिट्स’(61 Minutes) हा ऑडिओ ड्रामा आपल्याला ‘ऐकावा’ लागणार आहे आणि त्यासाठी आपल्याला ‘स्टोरीटेल’ हे app डाऊनलोड करावं लागणार आहे. ‘स्टोरीटेल’द्वारे सर्व भारतीय भाषांमध्ये ऑडिओबुक्सची निर्मिती केली जात आहे आणि त्याला साहित्यप्रेमी वाचक श्रोत्यारसिकांचा अमाप प्रतिसाद मिळू लागला आहे. दरमहा फक्त रू.२९९/- मध्ये मराठी, इंग्रजीसह सर्व भारतीय भाषांतील ऑडिओबुक्स किंवा दरमहा फक्त रू.१४९/- मध्ये, मराठीसह सर्व ११ प्रादेशिक भाषेमधील पुस्तके योजनेत मिळतात. ऑडिओबुक्स कुठेही, कितीही व कधीही ऐकता येतात.

 


Tags: 61 Minutes६१ मिनिट्सMukta barveSTORYTELUmesh kamatउमेश कामतमुक्ता बर्वेस्टोरीटेल
Previous Post

“पॉर्न अॅप्स, वेबसाईट, ओटीटीची टास्कफोर्सतर्फे झाडाझडती करा”

Next Post

पावसामुळे झालेल्या रस्ते व पुलांच्या हानीची पाहणी करण्याचे अशोक चव्हाण यांचे निर्देश

Next Post
Ashok chavan

पावसामुळे झालेल्या रस्ते व पुलांच्या हानीची पाहणी करण्याचे अशोक चव्हाण यांचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!