Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कुंद्राच्या ‘पॉर्न’तापाचे क्रिप्टोकरन्सीत व्यवहार, परदेशी बँकेत खाते, ईडीही चौकशी करण्याची शक्यता

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Raj Kundra (2)

मुक्तपीठ टीम

भलत्याच ‘पॉर्न’तापासाठी गजाआड गेलेल्या राज कुंद्राच्या चौकशीत आता रोज नवे गौप्यस्फोट होत आहेत. कुंद्राच्या अंधेरी कार्यालयात तपासणी करताना पोलिसांना एक रहस्यमय भिंत आणि एक छुपे कपाट सापडले आहे. त्यानंतर या कार्यालयात नव्याने शोधाधोध करण्यात आली. तेव्हा पोलिसांना कपाटात काही बॉक्स आणि कित्येक फाइल्स सापडल्या आहेत ज्यामध्ये क्रिप्टोकरन्सीशी संबंधित माहिती मिळालेली आहे. तसेच त्याचे येस बँकेप्रमाणेच यूनियन बँक ऑफ आफ्रिकेतही खाते असल्याचं पुढे आलं आहे. या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहारही झाले असल्याने आता ईडीही कुंद्रांच्या पॉर्नतापांची चौकशी करण्याची शक्यता आहे.

 

कुंद्राचे चार कर्मचारी माफीचे साक्षीदार!

कुंद्राच्या पापाची रोज नवी माहिती पुढे येऊ लागल्याने आता त्याच्या पॉर्न साम्राज्याला घरघर लागली आहे. त्याच्या चार कर्मचार्‍यांनी त्याच्याविरूद्ध माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दाखवली आहे. त्यांच्याकडून पोलिसांना कुंद्राचे पॉर्नताप कसे चालायचे हे कळले आहे. त्याच्या रॅकेटची पूर्ण माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे कुंद्राविरोधात मजबूत पुरावे पोलिसांकडे जमा होत आहेत. त्यामुळे कुंद्रांचा ताप आणखी वाढू शकतो.

 

भिंतीआड पॉर्नच्या काळ्या पैशाचे रहस्य

  • मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने १ जुलै रोजी कुंद्राच्या अंधेरी कार्यालयात छापा टाकला होता.
  • त्यावेळी पोलिसांनी कार्यालायची तपासणी केली होती.
  • परंतु तेव्हा लपवलेले कपाट सापडले नव्हते.
  • वियान इंडस्ट्रीजच्या कर्मचार्‍यांच्या चौकशीदरम्यान पोलिसांना याची माहिती मिळाली.
  • आतापर्यंत चौकशी दरम्यान राज कुंद्रा यांनीही त्याबद्दल काही सांगितलेले
  • शनिवारी एका कर्मचार्‍याने हे रहस्य पोलिसांना सांगितले.

 

परदेशी बँकेमध्येही खातं

  • राज कुंद्राचा १२१ इरॉटिक व्हिडीओची विक्रीचा सौदा अंतिम टप्प्यात आला होता.
  • पॉर्नच्या सौद्यातून कुंद्राला कोट्यवधी रुपये मिळविल्याचे पोलिसांना माहिती मिळाली आहे.
  • कुंद्राचे येस बँक आणि युनियन बँक ऑफ आफ्रिकेतील खात्यांची तपासणी केली जात आहे.
  • या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहारही झाले असल्याने आता ईडीही कुंद्रांच्या पॉर्नतापांची चौकशी करण्याची शक्यता आहे.
  • ईडीला पुरेसे पुरावे आढळले तर कुंद्राविरूद्ध फेमा आणि पीएमएलए अंतर्गत गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

Tags: EDraj kundraईडीक्रिप्टोकरन्सीराज कुंद्रावियान इंडस्ट्रीज
Previous Post

“तीन मागण्या फॅक्स करा, केंद्र-राज्याकडून मदत मिळवून देतो!”

Next Post

आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्तरावर यंत्रणा उभारणार

Next Post
Hon'ble CM Sir Photo 4

आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्तरावर यंत्रणा उभारणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!