मुक्तपीठ टीम
केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये केंद्रीय विद्यापीठ स्थापन करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने नुकतीच मंजुरी दिली आहे. यासाठी ७५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. पीआयबीचे महासंचालक जयदीप भटनागर यांनी सोशल मीडियावर ही माहिती शेअर केली. हे विद्यापीठ लडाखच्या स्थानिकांना उच्च शिक्षण आणि संशोधनात्मक कार्यासाठी प्रोत्साहन देणारं ठरेल.
कसं असणार लडाखचं केंद्रीय विद्यापीठ?
- लडाख विद्यापीठ उच्च शिक्षणातील प्रादेशिक असमोत दूर करेल.
- स्थानिक लडाखींच्या शैक्षणिक विकासासाठी उपयोगी ठरेल.
- लेह, कारगिल, लडाख हे विभाग विद्यापीठाच्या अखत्यारीत येतील.
- हे उच्च शैक्षणिक संस्थांसाठी एक मॉडेल म्हणून काम करेल.
पंतप्रधान मोदींनी आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात लडाखमध्ये नवीन विद्यापीठ स्थापनेची घोषणा केली होती. त्यांनी केलेल्या घोषणेची केंद्रीय मंत्रिमंडळाने लडाखमधील केंद्रीय मंत्रिमंडळाला मंजुरी दिल्यामुळे पूर्तता होणार आहे. केंद्रीय विद्यापीठाबरोबरच लडाखमध्ये पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठीही केंद्राने एक पाऊल उचलले आहे.
लडाखमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासासाठी महामंडळ
- केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रशासित प्रदेशात लडाख एकात्मिक पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापनेला मान्यता दिली आहे.
- सरकारच्या मते, यामुळे लडाखचा विकास होईल.
- या माध्यमातून स्वावलंबी भारताचे लक्ष्य साध्य करता येईल.
- लडाखमधील पायाभूत सुविधा बांधकाम संदर्भात हे महामंडळ मुख्य एजन्सी म्हणून काम करेल. असे एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
- हे या क्षेत्रातील उद्योग, पर्यटन, स्थानिक उत्पादनांचे विपणन, हस्तकलेमध्ये देखील मदत करेल.