मुक्तपीठ टीम
विद्यार्थ्यांना कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी कार्यरत ब्राईट फ्यूचर संस्थेच्या मिशन राहत मार्फत कुर्ला पूर्व नेहरूनगर येथील संस्थेच्या कार्यालयातपत्रकार आणि छायाचित्रकारांना जीवनावश्यक वस्तुंचे मोफत वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मुख्य पाहुणे माहिती अधिकार कार्यकर्ते आणि ज्येष्ठ पत्रकार अनिल गलगली यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ, हिंदी पत्रकार संघ, मुंबई प्रेस क्लब आणि मुंबई उपनगर पत्रकार संघाच्या वतीने आयोजक असलेल्या ब्राईट फ्यूचर संस्थेचे आभार मानले. कोरोना काळात पत्रकार आणि छायाचित्रकार यांनी जीवाची बाजी लावत माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी कार्य केले पण दुर्दैवाने अश्या कोविड योद्धा असलेल्यांना सरकार मान्यता देत नाही आणि अश्या वेळी ब्राईट फ्यूचर सारख्या संस्था पुढाकार घेत असल्याबाबत गलगली यांनी संस्थेचे कौतुक केले.
आजमितीला ब्राईट फ्यूचरचे मुख्य असलेल्या किशोर पालवे यांच्या मार्गदर्शनाखालीमिशन राहत अंतर्गत ५७ हजार नागरिकांना मदत केली आहे. कोरोना काळात २ हजार युवकांना रोजगार मिळवून दिला आहे. या कार्यक्रमात ब्राईट फ्यूचर संस्थेच्या तविता फर्नांडिस, प्राची मुक्तीबोध, हेमंत दांडू, किरण जगताप, मर्जीचे संतोष सोनवणे आणि संतोष वाघमारे उपस्थित होते.