मुक्तपीठ टीम
बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी खेळलेली चाल भाजपाच्या रणनीतीकारांनाही धक्का देणारी आहे. ममता आता त्यांच्या पक्षाच्या संसदीय नेत्या असतील. त्यामुळे त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलवलेल्या संसदीय पक्षांच्या प्रत्येक बैठकीत नेत्या म्हणून सहभागी असतील. वेगळी भूमिका मांडत राष्ट्रीय राजकारणात आपलं वेगळं स्थान निर्माण करू शकतील. त्याचवेळी त्या मुख्यमंत्रीपदीही कायम असल्यानं राज्याच्या राजकारणावरील त्यांची पकडही ढिली होणार नाही.
ममता तृणमूलच्या संसदीय नेत्या
• तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी ही माहिती दिली आहे.
• ममता २५ जुलैला दिल्लीला येणार आहेत.
• खासदार ब्रायन म्हणाले की ममता बॅनर्जींच्या थेट मार्गदर्शनाखाली संसदीय राजकारणात तृणमूल पक्ष म्हणून आणखी मजबूत होईल.
• ममता बॅनर्जी ७ वेळा खासदार राहिल्या आहेत.
ममतांचे राष्ट्रीय स्वप्न
• कोणताही पक्ष आपल्या ज्येष्ठ खासदाराची पक्षाच्या संसदीय मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवड करतो.
• या निवडीमागे तृणमूलची रणनीती स्पष्ट आहे.
• २०२४ साठी पक्षाला ममता बॅनर्जींना भाजपाविरोधी पक्षांच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवार म्हणून सादर करायचे आहे.
मोदींच्या बैठकीत सहभागाची संधी
• ममता केवळ मुख्यमंत्री म्हणून एका मर्यादेतच राष्ट्रीय मुद्द्यांवर भूमिका मांडू शकतात.
• मात्र, आता संसदीय नेत्या झाल्यानंतर त्या थेट त्यांच्या पक्षाचं राष्ट्रीय प्रतिनिधित्व करू शकतील.
• त्यामुळे पंतप्रधान मोदींनी दिल्लीतील कोणत्याही विषयावर विरोधी पक्षांच्या संसदीय नेत्यांची बैठक बोलावली तर ममता तेथे असतील.
मोदीविरोधी राष्ट्रीय चेहरा बनण्याची रणनीती
• कोरोना व्यवस्थापन, पेगॅसस हेरगिरी प्रकरण आणि अलीकडेच दैनिक भास्करसह माध्यमांवर धाड टाकल्याबद्दल ममता यांनी केंद्र सरकारवर उघडपणे टीका केली आहे.
• ममता कदाचित कोलकातामधूनच सुत्रे हलवतील, पण मुख्यमंत्रीपदाबरोबरच संसदीय नेतेपद हाती आल्यानंतर अधिक आक्रमकतेनं आणि अधिकारानं केंद्र सरकारवर हल्ला करत राहतील.
• त्यामुळे मोदीविरोधी चेहरा म्हणून त्या लोकप्रिय होतील, अशी रणीनीती आहे.
२५ जुलैपासून ममता दिल्लीत
• २५ जुलैपासून ममता बॅनर्जी २ ते ३ दिवस दिल्लीत असतील.
• यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही भेटणार आहेत.
• शक्य झालं तर त्या राष्ट्रपतींचीही भेट घेणार आहेत.
• त्या सोनिया गांधींसह विरोधी पक्षांच्या मोठ्या नेत्यांचीही भेट घेणार आहेत.
‘खेला होबे’ आता राष्ट्रीय पातळीवर…
• बुधवारी शहीद दिनानिमित्त ममता बॅनर्जी यांनी व्हर्च्युअल रॅली केली.
• त्या रॅलीतील त्यांच्या भाषणाचं उत्तर प्रदेश, दिल्ली आणि गुजरातसह अनेक राज्यांत स्थानिक भाषेत लाइव्ह स्ट्रिमिंग करण्यात आले.
• त्या भाषणातच ममता बॅनर्जींनी आता दिल्लीकडे लक्ष असून तेच लक्ष्य असल्याचं स्पष्ट केलं.