मुक्तपीठ टीम
नवीन कृषी कायद्यांचा विरोधात दिल्लीच्या सीमेवर आठ महिने आंदोलन करणारे शेतकऱ्यांनी दिल्लीत ‘जंतर-मंतर’ येथे ‘किसान संसद’ आयोजित केली आहे. सिंघू सीमेवरुन दररोज २०० आंदोलक शेतकरी किसान संसदेत उपस्थित राहणार आहेत. सिंघू सीमेवर सुरक्षा अधिक कडक केली गेली असून सर्वत्र पोलीस तैनात करण्यात आले आहेत. दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी जास्तीत जास्त २०० शेतकर्यांना ९ ऑगस्टपर्यंत आंदोलन करण्यास विशेष परवानगी दिली आहे. आंदोलक सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत आंदोलन करू शकणार आहेत.
कशी भरणार किसान संसद?
• शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ जुलैपासून दररोज २०० शेतकरी आंदोलक जंतर-मंतर येथे जातील.
• संसदेचं पावसाळी अधिवेशन संपेपर्यंत ‘किसान संसद’ आयोजित करतील.
• दररोज एक सभापती आणि एक उपसभापती निवडले जातील.
• “एपीएमसी कायद्याबाबत पहिल्या दोन दिवसांत चर्चा होईल.
• नंतर इतर कृषीविषय विधेयकांवरही दर दोन दिवसांनी चर्चा होईल.
• सहभागी होणाऱ्या प्रत्येक आंदोलकाला ओळखपत्र देण्यात येणार आहे.
९ ऑगस्टपर्यंत ‘किसान संसद’
• उपराज्यपालांनी २२ जुलै ते ९ ऑगस्टपर्यंत आंदोलनासाठी परवानगी दिली आहे.
• २६ जानेवारीच्या घटनेनंतर प्रथमच शेतकरी संघटनांना आंदोलनासाठी परवानगी मिळाली आहे.
• दररोज सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत जंतर-मंतर येथे २०० शेतकऱ्यांना आंदोलन करण्यास परवानगी दिली आहे.
• पोलिसांच्या देखरेखीखाली २०० आंदोलकांच्या जथ्याला जंतरमंतरपर्यंत जाण्याची मुभा दिली जाईल.
• कोरोना नियमांचे काटकोरपणे पालन करत करण्यास आदेशात बजावण्यात आले आहे.
सुरक्षा आणि कोरोना नियमांचे पालन
• शेतकरी आंदोलकांना कोरोना नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे.
• कोरोना निर्बंधामुळे शेतकरी संघटनांनी कोणताही मोर्चा काढू नका, अशीही अट घालण्यात आली आहे.
• शेतकऱ्यांचं आंदोलन शांततेत पार पडावं यासाठी दिल्ली पोलिसांकडून सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
• शेतकरी आपल्या मागण्यांसाठी जंतर-मंतरवर शांततेत आंदोलन करतील
• कोणीही शेतकरी आंदोलक संसदेत जाणार नाहीत.
• दिल्ली सीमेपासून जंतर-मंतर पर्यंत सुमारे सुरक्षा दलांच्या १०० कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत.
The courage of farmers is wonderful, Farmers agitation set an example in the history of India. We support #FarmersProtest#FarmersProtest_AtParliament pic.twitter.com/2USHctMi4V
— Murti Nain (@Murti_Nain) July 22, 2021