Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“काश्मीर पुनश्च भारताचे नंदनवन म्हणून ओळखले जाईल”: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

July 21, 2021
in सरकारी बातम्या
0
bhagat shing koshari

मुक्तपीठ टीम

काश्मीरची वाटचाल स्थैर्य व शांतीकडे सुरू झाली असून सर्वसामान्य लोक लोकशाही प्रक्रियेत सहभागी होत आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये काश्मीरचे योगदान अनन्यसाधारण असून काश्मीर प्रदेश लवकरच आपले गतवैभव प्राप्त करील व पुनश्च देशाचे नंदनवन होईल असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

 

साहित्य, संस्कृती, भाषा संरक्षण आणि संवर्धनाचे कार्य करणाऱ्या ‘हिंदी काश्मीर संगम’ या संस्थेच्या वतीने राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन व साहित्यिक व समाजसेवक यांचा सन्मान आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.

 

हिंदी काश्मीर संगम- काश्मीर अनुष्ठानच्या अध्यक्षा तसेच लेखिका व समाजसेविका डॉ. बिना बुदकी यांच्या “केसर की क्यारी में आग की लपटे आखिर कब तक” पुस्तकाचे तसेच ‘कश्मीर संदेश’ या नियतकालिकाचे राज्यपालांच्या हस्ते यावेळी प्रकाशन करण्यात आले.

 

राज्यपाल म्हणाले, काश्मीर ७०० ते ८०० वर्षापूर्वी भारताचे गौरव समजले जात होते. आता पुन्हा काश्मीरला गतवैभव मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तेथील सामान्य नागरिकही शांती निर्माण होण्यासाठी सकारात्मक आहेत. नुकतेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तेथील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

 

काश्मीर ही अभिमन्यू गुप्त, भरतमुनी, कल्हण प्रभृतींची तसेच काश्मीरी शैव तत्वज्ञानाची भूमी असून काश्मीरमध्ये भारतीय नाट्य शास्त्र, काव्य आणि साहित्याला महत्वपूर्ण स्थान आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या ७० वर्षानंतर काश्मीरमध्ये शांततेसाठी प्रयत्न सुरू असून ते लवकरच यशस्वी होतील, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला. काश्मीरमध्ये हिंदीचा प्रचार आणि प्रसार होणे ही गौरवास्पद बाब आहे. मात्र, संस्कृत ही सर्व भाषांची जननी असल्याने संस्कृतचे जतन आणि संवर्धन होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

काश्मीरमध्ये हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या डॉ. बिना बुदकी यांचे राज्यपालांनी अभिनंदन केले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. गौरवार्थींनीही भविष्यात साहित्य – शिक्षा आणि लोकसेवेचे कार्य अवरित सुरू ठेवावे, अशी अशा राज्यपालांनी व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावर महेश आचार्य, हिंदी काश्मीरी संगमचे सदस्य दिनेश बारोट उपस्थित होते.


Tags: governor bhagat singh koshyariKashmirकाश्मीरडॉ. बिना बुदकीदिनेश बारोटराज्यपाल भगतसिंग कोश्यारी
Previous Post

आज ८ हजार १५९ नवे रुग्ण, ७ हजार ८३९ घरी परतले!

Next Post

“भिवंडी-वाडा महामार्गावर तलावच तलाव! जीव धोक्यात घालत रोजचा हजारोंचा प्रवास!!”

Next Post
bhivandi

"भिवंडी-वाडा महामार्गावर तलावच तलाव! जीव धोक्यात घालत रोजचा हजारोंचा प्रवास!!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!