मुक्तपीठ टीम
आगामी महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लढण्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यानी केली होती. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यावर शिक्कामोर्तब केला आहे. नाना पटोले यांनी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी राहुल गांधी यांना राज्यातील पक्षाच्या भवितव्यासाठी ‘मास्टर प्लॅन’ सादर केला आहे, अशी माहिती दिली, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असूनही काँग्रेस स्थानिक निवडणुका एकट्यानेच लढवणार आहे असे नाना पटोले यांनी जाहीर केलेआहे.
दिल्लीत काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या समवेत राज्यातील प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या भेटीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी दिल्लीतूनच महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढेल, अशी घोषणा केली आहे. पक्षश्रेष्ठींचा हा निर्णय आहे तो सर्वांना पाळावा लागेल. तसेच कुठल्याही मंत्र्याच्या चुकीचा अहवाल काँग्रेस वरिष्ठांना गेला नाही,” असे पटोले म्हणाले.
काँग्रेस महाराष्ट्रात महाविकास आघाडी बरोबर सत्तेत आहे, पण गेल्या काही दिवसांपासुन नाना पटोले यांच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाले आहे. यावर भाष्य करताना नाना पटोले म्हणाले की, यापूर्वी महाराष्ट्र सरकार माझे फोन टॅप करत असून काही लोक काँग्रेसच्या पाठीवर वार करीत आहेत.