Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“पाण्याची तीव्र अडचण असणाऱ्या मराठवाड्यातील भागांना पाणी देण्यासाठी पर्याय शोधा” – जयंत पाटील

July 20, 2021
in घडलं-बिघडलं
0
jayant patil

मुक्तपीठ टीम

मराठवाड्यातील पाण्याची तीव्र अडचण भासत असणाऱ्या जिल्ह्यांचा, तालुक्यांचा व भागांचा अभ्यास करावा तसेच या भागांना पाणी देण्यासाठीचे पर्याय शोधावे असे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज संबधित अधिकाऱ्यांना दिले.

सिल्लोड तालुक्यातील जलसंपदा विभागाच्या विविध प्रश्नांबाबत आज महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समवेत मंत्रालय येथे बैठक पार पडली.

या बैठकीत भराडी बृहत लघु पाटबंधारेसंदर्भात सर्वेक्षण करण्याबाबत चर्चा झाली. त्याचे सर्वेक्षणाचे काम लवकर पूर्ण करावे, असे निर्देशही मंत्री जयंत पाटील यांनी दिले.

या भागातील अजिंठा, अंधारी मध्यम प्रकल्प, सोयगाव लघु प्रकल्पातील अतिरिक्त वाहून जाणारे पाणी, सिल्लोड व सोयगाव तालुक्यातील प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्तीबाबत, खेळणा मध्यम प्रकल्पाची उंची वाढविणे, व या तालुक्यातील नविन सिंचन प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पाणी उपलब्धतेनुसार नवीन सिंचन प्रकल्पासाठी सर्वेक्षण करण्यात यावे. तसेच सिल्लोड विश्रामगृह, खेळणा विश्रामगृह व सिल्लोड कार्यालय दुरुस्ती करणेबाबत कार्यवाही करण्यात यावी अशी चर्चाही बैठकीत करण्यात आली.

दरम्यान सिल्लोड तालुक्यात पाण्याची मोठी टंचाई असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे या भागात पाणी पोहोचवण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील, असे आश्वासन मंत्री जयंत पाटील यांनी दिले.


Tags: jayant patilMarathwadawater scarcitywater scarcity Marathwadaजंयत पाटीलपाणी टंचाईमराठवाडा
Previous Post

मुंबईतील सर्व न्यायालयात १ ऑगस्ट रोजी लोक अदालतीचे आयोजन

Next Post

गावकी आणि भावकीच्या ‘पंगतीतलं पान’ स्टोरीटेलवर!

Next Post
storytel

गावकी आणि भावकीच्या 'पंगतीतलं पान' स्टोरीटेलवर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!