Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रिंगणच्या संत नरहरी सोनार विशेषांकाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

July 20, 2021
in घडलं-बिघडलं
0
ringan

मुक्तपीठ टीम

गेली नऊ वर्षं सुरू असलेली परंपरा यावर्षी कोरोनाकाळातही सुरू राहिली. रिंगण या वार्षिकाचं पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीच्या पहाटे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन झालं. संतपरंपरेचा सामाजिक सांस्कृतिक मागोवा घेणाऱ्या रिंगणचं यंदा नववं वर्ष आहे.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर तसंच मानाचे वारकरी यांच्या उपस्थितीत रिंगणच्या संत नरहरी सोनार विशेषांकाचं प्रकाशन झालं. २०१२ला रिंगणचा पहिला अंक प्रकाशित झाला होता. तेव्हापासून गेली ९ वर्षं हा आषाढी अंक प्रकाशित होतोय.

 

रिंगणचे संपादक सचिन परब यंदाच्या विशेषांकाविषयी म्हणाले, ‘आपल्या जगण्यातून महाराष्ट्राला समन्वयाचा रस्ता दाखवणारे संत नरहरी सोनार यांचा शोध एकाच वेळेस आव्हानात्मक आणि आनंददायक होता. पंढरपूर, पैठण, आळंदी, त्र्यंबकेश्वर, वाराणसी, नवगण राजुरी, आटपाडी, धुळे, नेवासा, परभणी इतक्या ठिकाणी नरहरीरायांच्या प्रभावखुणा शोधण्याचा केलेला प्रयत्न, हे यंदाच्या अंकाचं वैशिष्ट्य ठरावं.’

 

संत नरहरी सोनार यांच्याविषयी ३७ लेख असणारा रिंगणचा अंक १६४ पानांचा आहे. संपूर्ण आर्टपेपरवर असणारा हा देखणा अंक फोटो आणि चित्रांनी सजला आहे. यात डॉ. सदानंद मोरे, डॉ. रंगनाथ तिवारी, डॉ. मंगला सिन्नरकर, डॉ. श्यामसुंदर मिरजकर, डॉ. रुपाली शिंदे, नंदन रहाणे, नीलेश बने, डॉ. ओमश्रीश श्रीदत्तोपासक संजीव खडके, ग. शां. पंडित यांच्यासह अनेक मान्यवरांनी लेखन केलंय.

 

लवकरच अंक महाराष्ट्रभरातल्या प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे विक्रीसाठी उपलब्ध असेल. अंक घरपोच हवा असेल तर संपर्क –
प्रदीप पाटील ९८६०८३१७७६ । ९४२१०५५२०६
सुधीर शिंदे ९८६७७५२२८० । ९९६०३७४७३९

 

 


Tags: Aaditya Thackeraychief minister uddhav thackerayआदित्य ठाकरेदत्तात्रय भरणेमुख्यमंत्री उद्धव ठाकरेरश्मी ठाकरेसंत नरहरी सोनार
Previous Post

ज्येष्ठ कृष्ण अष्टमी ते आषाढ शुद्ध दशमी…अगम्य असा पालखी सोहळा!

Next Post

पेगॅसस हेरगिरी: अमित शाह यांच्या ‘क्रोनोलॉजी’ आरोपामागील रणनीती समजून घ्या!

Next Post
amit shah

पेगॅसस हेरगिरी: अमित शाह यांच्या ‘क्रोनोलॉजी’ आरोपामागील रणनीती समजून घ्या!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!