Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पाऊस पडताच नाला झाला हिरवा…मनसे आमदाराने आदित्य ठाकरेंचं लक्ष वेधलं!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
dombivali

मुक्तपीठ टीम

मुसळधार पावसाच्या संततधारेनं सर्वत्रच पाणीकोंडी झाली आहे. त्या पाण्याचा रंग कुठे काळा, कुठे मातकट आहे. तर डोंबिवलीतील एका नाल्यातील पाण्याचा रंग चक्क हिरवागार झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा डोंबिवलीतील प्रदूषणाचा प्रश्न भर पावसात उघड झाला आहे. या हिरव्या नाल्याचा व्हिडीओही आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं लक्ष या हिरव्या नाल्यानं उघड केलेल्या प्रदूषण समस्येकडे वेधले आहे.

नाला कसा झाला हिरवा?

  • डोंबिवली पूर्व येथील गांधीनगर परिसरातील नाल्यातील पाणी हिरवे झाले आहे.
  • डोंबिवलीत प्रदूषणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून आहे.
  • या हिरव्या रंगाचा नाला पाहून नागरीकांना लगेच कळले की हा पावसाच्या पाण्याचा रंग नसून प्रदूषणाचा आहे.
  • परिसरातील नागरिकांनी त्याच्या विरोधात आवाज उठविला.
  • काही नागरिकांनी या हिरव्या रंगाचा नाल्याचे व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केले.

 

मनसे आमदार राजू पाटील यांचं ट्विट

  • संबंधित नाल्याच्या व्हायरल व्हिडीओंची दखल कल्याण पूर्व ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांनीही घेतली.
  • त्यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना ट्विट करून जीवघेण्या प्रदुषणापासून डोंबिवलीकरांची सुटका कधी होणार? असा प्रश्न केला आहे.

 

डोंबिवलीकरांची या जीवघेण्या प्रदुषणापासून सुटका कधी होणार ? गांधीनगरचा हा नाला बंधिस्त करावा किंवा पाईपलाईन द्वारे केमिकलयुक्त पाणी सोडण्यात यावे यासाठी @KDMCOfficial आयुक्तांकडे सतत पाठपुरावा करूनही काहीच होताना दिसत नाहीत. पर्यावरण मंत्री श्री.@AUThackeray जी , जरा लक्ष द्या. pic.twitter.com/Pj8HFw3eHO

— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) July 19, 2021

 

“डोंबिवलीकरांची या जीवघेण्या प्रदुषणापासून सुटका कधी होणार? गांधीनगरचा हा नाला बंधिस्त करावा किंवा पाईपलाईनद्वारे केमिकलयुक्त पाणी सोडण्यात यावे यासाठी केडीएमसी आयुक्तांकडे सतत पाठपुरावा करूनही काहीच होताना दिसत नाहीत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेजी जरा लक्ष द्या”, असं राजू पाटील म्हणाले.

 

संबंधित कंपनीविरोधात कठोर कारवाई

  • नाल्याच्या हिरवेकरणाची गंभीर दखल कल्याण-डोंबिवली मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतली आहे.
  • त्यांनी एमआयडीसीकडे संपर्क साधला असता एमआयडीने याप्रकरणी नाल्यात केमिकल सोडणाऱ्या रायबो फाम या कंपनीचा पाणी पुरवठा खंडीत केला आहे.
  • तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाने या कंपनीच्या विरोधात कठोर कारवाई करावी, असे आदेश दिले आहे.

 

डोंबिवलीसाठी प्रदूषण नेहमीचेच!

  • २०१४ साली डोंबिवली प्रदूषणामुळे हिरवा पाऊस पडला होता. २०१९ मध्ये डोंबिवलीत प्रदूषणामुळे रस्ता गुलाबी झाला होता.
  • त्याची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली होती.
  • त्यानंतरही प्रदूषण करणाऱ्या कंपन्या सुधारल्या नाही तर त्यांना टाळे ठोकण्याचा इशारा दिला गेला होता.

Tags: aditya thackerayDombiwaliRaju Patilआदित्य ठाकरेडॉ. विजय सूर्यवंशीडोंबिवलीराजू पाटील
Previous Post

“आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी सिनेमा झळकण्यासाठी पुढाकार घेणार”: अमित देशमुख

Next Post

“पेगॅससच्या माध्यमातून पाळत ठेवून फोन हॅक करण्याची बाब गंभीर असून याप्रकरणाची चौकशी करण्यात यावी”: नवाब मलिक

Next Post
nawab malika

"पेगॅससच्या माध्यमातून पाळत ठेवून फोन हॅक करण्याची बाब गंभीर असून याप्रकरणाची चौकशी करण्यात यावी": नवाब मलिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!