मुक्तपीठ टीम
मुंबई उच्च न्यायालयाने एका बलात्कार प्रकरणी ३३ वर्षीय आरोपीची शिक्षा कायम ठेवली आहे. सुनावणीवेळी न्यायालयाने एक मोठी टिप्पणीही केली आहे. यौन संबंधांविना केलेली जबरदस्ती ही कलम ३७६ अंतर्गत बलात्कारच आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांनी २०१९ मध्ये जिल्हा सत्र न्यायालयाने बलात्काराच्या आरोपाखाली १० वर्षांची शिक्षा सुनावलेल्या आरोपीची शिक्षा कायम ठेवली आहे.
मागील महिन्यात उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. जिल्हा सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला बलात्काराच्या आरोपाखाली शिक्षा सुनावली होती. आरोपीच्या वकीलांकडून आरोपीकडून यौन शोषण झालं नसल्याचा युक्तीवाद केला गेला होता. मात्र फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारावर शोषण झाल्याचं निष्पन्न झालं होतं.
काय म्हणालं उच्च न्यायालय?
- घटनास्थळावरची माती ही आरोपीचे कपडे आणि पीडितेच्या अंगावर मिळालेल्या मातीचे नमुने एकच आहेत.
- फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये ही माहिती समोर आली आहे.
- पीडितेचं यौन शोषण झाल्याचा हा पुरावा आहे.
- महिला, मुलींच्या प्रायव्हेट पार्ट्सना स्पर्श करणंही कायद्याने गुन्हा आहे.