मुक्तपीठ टीम
बीएसए लेडीबर्ड या मुलींसाठीच्या भारतातील पहिल्या सायकल ब्रँडने बाजारपेठेत २५ वर्ष यशस्वीपणे पूर्ण केली आहेत. ट्यूब इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडिया लिमिटेडच्या बीएसए लेडीबर्ड सायकल्सना अभिजातता आणि स्त्रीत्व यांमुळे कायमच पसंती मिळाली आहे. या सायकल्स किशोरवयात येत असलेल्या मुलींमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत.
गेल्या अडीच दशकांपासून ब्रँडने मुलींना स्वतंत्र आणि जबाबदार बनण्यासाठी सक्षम केले असून किशोरवयाकडे वाटचाल करत स्वतःची ओळख, स्वतःचे समाजातले स्थान शोधत असलेल्या मुलींना या नाजूक काळात आपल्या मालकीचे काहीतरी मिळवून दिले आहे.
बीएसए लेडीबर्ड – किशोरींचा हमसफर!
• बीएसएने ग्राहक- केंद्रीत सायकल्सची विस्तृत श्रेणी उपलब्ध केली आहे.
• ती स्टायलिश, धमाल, व्यवहार्य, विश्वासार्ह आणि वापरण्यास सोपी म्हणून ओळखली जाते.
• अँटी स्लिप चेन, कुशन्ड सॅडल्स, सॉफ्ट हँड ग्रिप्स, स्टेप थ्रु फ्रेम्स, ईझी ग्लाइड हब्ज, फ्रंट बास्केट इत्यादी आणि विविध वैशिष्ट्यांनी समृद्ध असलेला हा ब्रँड आहे.
• या ब्रँडला तरुण, उत्साही मुलींना आरामदायी राइड मिळवून देणारा अशी ओळख आहे.
३५ लाख किशोरींची लेडीबर्ड ही पसंत!
रौप्यमहोत्सवी टप्पा जाहीर करताना टीआय सायकल्स ऑफ इंडियाचे अध्यक्ष केके पॉल म्हणाले, ‘मजा, स्वातंत्र्य, उर्जा, स्टाइल आणि आरामदायीपणा ही मूल्ये बीएसए लेडीबर्डशी सुसंगत आहेत. गेल्या २५ वर्षांत बीएसए लेडीबर्डने केवळ मुलींच्या स्वातंत्र्याच्या प्रवासात साथ दिली नाही, तर ती या मुलींचे व्यक्तिमत्त्व आणि स्टाइलचा अविभाज्य भाग झाली आहे. केवळ गेल्या एका दशकात ३५ लाख मुली व तरुणींनी बीएसए लेडीबर्ड सायकल चालवण्याचा आऩंद अनुभवला आहे. ही भावना आणखी प्रबळ करण्यासाठी आम्ही एक फिल्म वितरित केली असून त्यात कशाप्रकारे लहानपणीचे अनुभव आपल्याला समृद्ध करतात हे दाखवलेलं आहे. स्त्रियांच्या त्यांचा स्वप्नांचा पाठपुरावा करता यावा, त्यांना खंबीर होता यावे यासाठी आपण योग्य वेळी या मुलींसाठी असलेले स्वातंत्र्याचे महत्त्व लक्षात घ्यायला हवे. आपल्या विकासाच्या प्रवासात आम्हाला समावून घेतल्याबद्दल आणि आमच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आज आम्ही त्यांचे आभार मानतो.’
‘फन टर्न्स २५’ असे नाव असलेल्या या फिल्ममध्ये बीएसए लेडीबर्डची वैशिष्ट्ये दाखवण्यात आली असून ती येथे पाहाता येईल – https://www.youtube.com/watch?v=kcfCxmKFD8E
बीएसएची त्रीसुत्री!
• बीएसए लेडीबर्डच्या यशामागे सर्वोत्तम उत्पादने आणि सेवा पुरवणारी, मेहनती व समर्पित टीम समान उद्दिष्टासह काम करत आहे.
• इतक्या वर्षात या टीमने नाविन्यपूर्ण उत्पादने, कार्यक्षम उत्पादन आणि ग्राहक समाधान उंचावण्यासाठी काम केले आहे.
• बीएसए सायकल्सचे उत्पादन अंबात्तुर आणि राजपुरा कारखान्यात केले जाते आणि देशभरातील कंपनीच्या १९० वितरकांच्या ट्रॅक अँड ट्रेल रिटेल चॅनेलद्वारे पॅन भारतात त्यांची विक्री केली जाते.
• ८ ते १५ वयोगटातील मुली या सायकल्सच्या प्रमुख ग्राहक असून त्या शाळा, शिकवणी वर्ग, मित्र- मैत्रिणींबरोबर बाहेर जाण्यासाठी किंवा नवनवे अनुभव मिळवण्यासाठी त्यांचा वापर करतात.
सर्वांसाठी सायकलिंग!
सर्वांसाठी सायकलिंग या तत्वाचा प्रसार करण्यावर बीएसएचा विश्वास आहे. तरुण मुलींशिवाय कंपनीकडे लहान मुलांसाठीच्या सायकल श्रेणीही उपलब्ध आहे. सायकलिंग मजेदार झाल्यामुळे मुलांमध्ये मोटर डेव्हलपमेंटसाठी आवश्यक कौशल्ये विकसित होण्यास मदत होते तसेच आत्मविश्वास सुधारणे, स्वावलंबाची भावना येणे, नवनवीन जागी जाणे आणि चांगली सामाजिक कौशल्ये आत्मसात करणे त्यांना शक्य होते. त्याशिवाय मुलांना सक्रिय आणि निरोगी राहाण्यासही मोठी मदत होते.
टीआय सायकल्सविषयी
मुरुगप्पा समूहातर्फे १९४९ मध्ये स्थापना झाल्यांतर ट्युब इन्व्हेस्टमेंट (युके) यांच्या सहकार्याने टीआय सायकल्सने सायकल उत्पादन आणि डिझायनिंग कामातून मोबिलिटी आणि स्वास्थ्यासाठी पूरक उपाययोजना क्षेत्रातील तज्ज्ञ बनण्याकडे वाटचाल सुरू केली.
बीएसए, हर्क्युलस आणि मोंत्रा या प्रमुख सायकल ब्रँडसाठी ओळखल्या जाणाऱ्या टीआय सायकल्सने अक्षरशः देशातील प्रत्येक प्रकारची सायकल तयार केली आहे व तिला काळानुसार सर्वोत्तम बनवले आहे. टीआय सायकल्सचे उत्पादन कारखाने अंबात्तुर/चेन्नई आणि राजपुरा येथे असून त्याद्वारे देशभरातील २५०० पेक्षा जास्त डीलर- नेटवर्कला सेवा दिली जाते. प्राथमिक वितरक आणि १०,००० पेक्षा जास्त दुसऱ्या श्रेणीतील वितरकांच्या मदतीने कंपनीचे अस्तित्व देशभर विस्तारलेले आहे.
मुरुगप्पा समूहाविषयी
१९०० मध्ये स्थापन झालेल्या ३८९ अब्ज रुपयांचा (३८,१०५ कोटी) मुरुगप्पा समूह हा भारतातील आघाडीच्या व्यावसायिक समूहांपैकी एक आहे. समूहाच्या २९ व्यवसायांमध्ये एनएसई व बीएसईवरील १० नोंदणीकृत कंपन्यांचा समावेश आहे. चेन्नईमध्ये समूहाचे मुख्य असून त्यांच्या प्रमुख कंपन्यांमध्ये कार्बोरंन्दम युन्व्हर्सल लि., सीजी पॉवर आणि इंडस्ट्रीयल सोल्यूशन्स लि., चोलामंडलम फायनान्शियल होल्डिंग्ज लि., चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लि., चोलामंडलम एमएस जनरल इन्शुरन्स कंपनी लि., कोरामंडेल इंटरनॅशनल लि., कोरामंडेल इंजिनियरिंग कंपनी लि., पॅरी अग्रो इंडस्ट्रीज लि., शांथी गियर्स लि., ट्युब इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडिया लि. आणि वेन्डेट (इंडिया) लि. यांचा समावेश आहे.
कंपनीतर्फे सेवा दिल्या जाणाऱ्या क्षेत्रांमध्ये अब्रेसिव्ह्ज, वाहनाचे सुटे भाग, ट्रान्समिशन सिस्टीम, सायकल्स, साखर, शेतीसाठीचा कच्चा माल, खते, रोपे, जैव- उत्पादने आणि पोषणतत्वे यांचा समावेश आहे. कंपनीने आघाडीच्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांबरोबर करार केले असून त्यात ग्रुपे केमिक ट्युनिशियन, फॉस्कॉर, मित्सुई सुमितोमो, मॉर्गन अडव्हान्स्ड मटेरियल्स, सोसिदादक्विमिका वाय मिनिएरा दे चिले (एसक्यूएम), यानमार अँड कं आणि कॉम्पेजिन देस फोस्फॅट दे गाफ्सा (सीपीजी) यांचा समावेश आहे. समूहाने भौगोलिक अस्तित्व संपूर्ण भारतात व ६ खंडांत पसरलेले आहे.
बीएसए, हर्क्युलस, मोंत्रा, माक सिटी, बॉलमास्टर, अजाक्स, पॅरीज, चोला, ग्रोमॉर, शांथी गियर्स आणि पॅराम्फोस हे प्रसिद्ध ब्रँड मुरुगप्पा समूहातून आले आहेत. समूहामध्ये व्यावसायिक वातावरण जपले जाते आणि ५१,००० कर्मचारी येथे काम करतात.
अधिक माहितीसाठी भेट द्या www.murugappa.com