मुक्तपीठ टीम
मुंबईकर आणि पर्यंटकांच्या सोयीसाठी मुंबईतील रस्त्यांच्या दिशादर्शक फलकांमध्ये क्यूआर कोडची व्यवस्था केली जात आहे. त्यामुळे रस्त्याविषयी आवश्यक माहिती सहजतेने मिळणार आहे.
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकतीच नवीन क्यूआर कोड असलेल्या दिशादर्शकांची पाहणी केली. हे दिशादर्शक दिशा दाखवण्याचे मुख्य काम करणार आहेच, मात्र त्याच्या सोबतचे क्यूआर कोड आपल्याला त्या रस्त्याच्या नावाचा इतिहास, माहिती सांगतील.
राज्याचे पर्यटन मंत्री म्हणून माहिम किनारा ते दादर शिवाजी पार्क परिसरातील पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या ठिकाणांची आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात दादर शिवाजी पार्क, माहिम समुद्र किनारा आणि कॉजवे परिसराचा समावेश होता. ते स्वत: प्रत्येक ठिकाणी गेले आणि त्यांनी प्रत्येक आराखडा पाहिला. प्रस्तावित माहीम कॉजवे ते सिद्धिविनायक मंदिर कल्चरल पाथवे म्हणजेच सांस्कृतिक पदपथाबद्दलही बद्दलही यावेळी चर्चा झाली.
पाहा व्हिडीओ: