मुक्तपीठ टीम
नांदेड शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंपळगांव महादेव गावातील ही लेक आहे. गावातील अल्पभुधारक शेतकरी रामराव आणि सुनिता कल्याणकर यांची पूनम ही मुलगी. तिने अपार मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. अखेर डॉक्टर होण्याचे तिचे स्वप्न साकार झाले. पूनम ही पिंपळगांव महादेव येथील पहिली महिला डॉक्टर आहे. आता ती आंबेजोगाईला पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. तिला स्त्री रोग तज्ज्ञ व्हायचे आहे. आपल्या मुलीने डॉक्टर व्हावे हे आईचे स्वप्न साकारण्यासाठी पूनमने घेतलेले परिश्रम प्रेरणादायी आहेत. पूनमविषयी सर्व माहितीसाठी www.muktpeeth.com च्या चांगल्या बातम्या कॅटेगरीला भेट द्या.
पूनमने पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण पिंपळगाव जिल्हा परिषद शाळेत घेतले. ती पाचवी ते दहावी सावित्रीबाई फुले हायस्कुलमध्ये शिकली. दहावी मध्ये ९५ टकके, बारावी यशवंत कॉलेज नांदेड ८४ टक्के, नीट परीक्षेत ४७४ मार्क मिळवले. एम.बी.बी.एस.ची पदवी तिने प्रथम श्रेणीमध्ये पूर्ण केली. आता नीट पी जी २०२० मध्ये ६६० गुण घेत, एम.एस.ओ.बी.जी.वाय. शिक्षणासाठी आंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय येथे स्त्रीरोग तज्ज्ञ शिक्षण घेत आहे. घवघवीत यश मिळवत आपल्या तिने आईचे स्वप्न सत्यात उतरविले.
आई सुनिता व वडील रामराव कल्याणकर यांनी काटकसर करत आपल्या मुलांना शिकवले. मुला-मुलींच्या शिक्षणाकडे त्यांनी दुर्लख होऊ दिले नाही. त्यांच्यात शिक्षणाची आवड निर्माण केली. त्यांना सातत्यानी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कठोर परिश्रम घेण्याचे बाळकडू पाजले. लेकीच्या या यशामुळे मात्र त्यांचे कष्ट सार्थकी लागले.
पाहा व्हिडीओ: