मुक्तपीठ टीम
भारतीय मोबाइल बाजारात स्मार्टफोनला मागणी भरपूर असताना फीचर फोनला सुद्धा जबरदस्त मागणी आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही फीचर फोन संबंधी माहिती देत आहोत. ज्याची किंमत एक हजार रुपयांपेक्षा कमी आहे. जर तुम्ही कोणता स्वस्त फोन खरेदी करायचा विचार करत असाल तर तुम्हाला ऑनलाईन – ऑफलाईन स्वरुपात १ हजार रुपये पासून कमी किमती मध्ये फोन मिळू शकतात. भारतामध्ये कार्बन, लावा, डेटेल, इंटेल, मायक्रोमॅक्स आणि अशा आणखी काही कंपन्यांचे फोन आहेत ज्यांची किंमत हजार रुपयांपेक्षा कमी आहे.
लावा ए १ जोश प्राईज आणि फिचर्स
लावाच्या या फोन मध्ये ४एमबी रॅम आणि १केबी स्टोरेज दिली आहे. फोन मध्ये १.८ इंचाचा क्यूव्हीजीए डिस्प्ले, ८००एमएएचची बॅटरी दिली आहे. कंपनीने फोन वर एका वर्षाची वॉरेंटी आणि एक्सेसरीज वर ६ महिन्याची वॉरेंटी दिली आहे. या फोनची किंमत फ्लिपकार्ट वर ९५५ रुपये आहे.
मायक्रोमॅक्स एक्स४१२ प्राईज आणि फीचर्स
मायक्रोमॅक्सच्या या फोन मध्ये ३२एमबी रॅम आणि ३२ एमबी स्टोरेज मिळते. फोनमध्ये १.७७ इंच चा डिस्प्ले आहे. फोन मध्ये ८००एमएएच इतकी बॅटरी दिली आहे. या फोनसोबत कंपनी एक वर्षाची वॉरेंटी देते. फोनची किंमत ८४९ रुपये आहे.
डेटेल डी १ गुरू प्राईज आणि फीचर्स
डेटेलच्या या फोन मध्ये ३२एमबी रॅम आणि ३२जीबी स्टोरेज दिला आहे.फोन मध्ये १०००एमएएचची बॅटरी दिली आहे. कॅमेरा सेटअप मध्ये ०.३एमपी चा रिअर कॅमेरा दिला आहे. हा फोन फ्लिपकार्ट वर ७२५ रुपये मध्ये खरेदी केला जाऊ शकतो.
आयटेल आयटी १६३ प्राईज आणि फीचर्स
आयटेलच्या या फोन मध्ये ४एमबी रॅम आणि ४एमबी स्टोरेज मिळतो, ज्याला माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने ३२जीबी पर्यंत वाढवले जाऊ शकते. या फोनमध्ये एससी६५३१इ प्रॉसेसर दिला आहे. यात १०००एमएएच लिथियम आयन बॅटरी दिली आहे.अमेझॉन वर हा फोन ९५० रुपये मध्ये खरेदी केला जाऊ शकतो.
कार्बन के १९ रॉक प्राईज आणि फीचर्स
ह्या फोन मध्ये ३२ एमबी रॅम आणि ३२ एमबी स्टोरेज आहे. ज्याला माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने १६ जीबी पर्यंत वाढवले जाऊ शकते. फोन मध्ये १.८ इंच डिस्प्ले आहे. त्यासोबतच १७५० एमएएचची बॅटरी दिली आहे. कंपनी १ वर्षाची वॉरेंटी आणि एक्सेसरीज वर ६ महिन्याची वॉरेंटी देते. अमेझॉन वर या फोनची किंमत ९३५ रुपये आहे.