मुक्तपीठ टीम
पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतील तांदळाच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात भाजपने एक हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. ‘रेशनवरील तांदूळ घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा’,अशी मागणी भाजपाने केली आहे. दरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही रेशनवरील तांदूळ घोटाळा प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. तांदूळ घोटाळ्याचे धागेदोरे वरपर्यंत गेले आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यापर्यंत तांदूळ घोटाळ्याची व्याप्ती होत आहे, त्याचे धागेदोरे खूप वरपर्यंत गेले असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या तांदूळ घोटाळ्याची अद्याप चौकशी झाली नसल्यानं शंका वाढल्याचंही फडणवीस यांनी म्हटलंय. चौकशी झाल्यास अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता आहे. त्यात अन्न पुरवठा अधिकारी आणि राईस मिलच्या मालकांचा समावेश असण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
केंद्राच्या सहकार खात्याची भीती सहकार बुडवणाऱ्यांनाच!
- सहकार बुडवला त्यांनाच या नव्या खात्याबाबत भीती.
- ज्यांनी सहकार चळवळीत चुकीचं काम केलं
- सहकार बुडवला त्यांनाच या नव्या खात्याबाबत भीती आहे.
- मात्र, ज्यांनी सहकार श्रेत्रात चांगलं काम केलं, त्यांनी या नव्या खात्याचं स्वागतच केल्याचं फडणवीस म्हणाले.
- केंद्रीय मंत्री अमित शाह हे खूप आधीपासून सहकार क्षेत्रात काम करत आहेत.
- त्यांच्या राजकारणाची सुरुवातच सहकारातून झाली आहे.