Thursday, March 12, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना चौरस आहारासाठी एकात्मिक योजनेला थेट निधी द्यावा

महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची मागणी

January 19, 2021
in सरकारी बातम्या
0
Women and Child Development

मुक्तपीठ टीम

 

भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचा निधी जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) निधी योजनेमधून दिला जात होता.  याबाबत अनेक तक्रारी येत असल्याने अमृत आहाराचे वितरण योग्यरित्या होण्यासाठी हा निधी थेट एकात्मिक बाल विकास सेवा योजनेला देण्यात यावा, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.

 

अमृत आहार योजनेबाबत आढावा बैठक आज मंत्रालय येथे घेण्यात आली. या बैठकीस आदिवासी विकास विभागाचे सचिव डॉ. अनूपकूमार यादव, एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त इंद्रा मालो, आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे, आदिवासी विकास विभागाचे सहसचिव  भा.र. गावित, महिला व बालविकास विभागाचे अवर सचिव र.सी.जरांडे, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे सह आयुक्त सचिन साबळे उपस्थित होते.

 

ॲड. ठाकूर म्हणाल्या, भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेंतर्गत अनुसूचित क्षेत्रातील गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना एकवेळचे चौरस आहार देण्यासाठी या योजनेंच्या माध्यमातून मान्यता देण्यात आली आहे. अनुसूचित क्षेत्रातील कुपोषण, बालमृत्यू व कमी वजनाची बालके जन्माला येणे यासारख्या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी परिणामकारक उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. बालकांच्या जन्मानंतर पहिले तीन महिने मूल पुर्णत: मातेवर अवलंबून असल्यामुळे या कालावधीत मातेचे आरोग्य व पोषण चांगले राहणे आवश्यक आहे. ही योजना आदिवासी विभागाच्या नियंत्रणाखाली व एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येणार असून याअंतर्गत चालणाऱ्या कामकाजाचा आढावा घेणार आहे.या योजनेची अंमलबजावणी व योजनेसाठीच्या निधीचे वितरण योग्यरित्या करण्यात यावे, असे निर्देश ॲड. ठाकूर यांनी यावेळी दिले.

 

या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित क्षेत्रातील प्रत्येक गाव सामावून घेण्यात येईल. यासाठी आदिवासी विकास विभागाने आपली कार्यप्रणाली सादर करावी. निधी वितरणामध्ये सुधारणा करण्यात यावी, अशी सूचनाही ॲड. ठाकूर यांनी केली.


Tags: Child mortalityDr. A.P.J. Abdul KalammalnutritionMinister for Women and Child Development Adv. Yashomati Thakurआदिवासी विभागकुपोषणचौरस आहारडॉ. ए.पी.जे. अब्दुल कलामबालमृत्यूमहिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर
Previous Post

कोरोना लसीच्या साइडइफेक्टची भीती…’हे’ नक्की वाचा!

Next Post

नागपूरच्या प्राणी संग्रहालयाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव

Next Post
balasaheb thackeray

नागपूरच्या प्राणी संग्रहालयाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!