मुक्तपीठ टीम
भारतातील औद्योगिक जमीन खरेदी विक्रीसाठी सरकारने इंडिया इंडस्ट्रियल लँड बँक (आयआयएलबी) एक जीआयएस-आधारित पोर्टल सुरु केले आहे. हे पोर्टल कनेक्टिव्हिटी, इन्फ्रा, नैसर्गिक संसाधने आणि भूभाग, रिक्त भूखंडांवरील भूखंड -स्तरीय माहिती, उपक्रमांचा मार्ग आणि संपर्काची माहिती इत्यादी सर्व औद्योगिक पायाभूत सुविधांशी संबंधित माहितीचे भांडार आहे. बसल्या जागी अशा जमिनींची संपूर्ण माहिती मिळत असल्यानं अमेरिकेसह जगभरातून लँडबँकेच्या वेबपोर्टलला आणि अॅपला मिळणारा प्रतिसाद वाढतच आहे.
लँड बँकेकडे आहे काय?
• सध्या आयआयएलबीकडे ५.५ लाख हेक्टर क्षेत्रावर अंदाजे ४,००० औद्योगिक पार्क आहेत.
• ते दूरस्थपणे जमीन शोधण्यासाठी गुंतवणूकदारांना निर्णय घेण्यासाठी माहिती पुरवणारा आधार म्हणून काम करतात.
• रिअल-टाइम आधारावर अद्ययावत केलेल्या पोर्टलवर तपशील देण्यासाठी ही प्रणाली सध्या १७ राज्यांच्या उद्योग-आधारित जीआयएस प्रणालीशी जोडली गेली आहे.
• डिसेंबर २०२१पर्यंत ती देशभरात जोडली जाईल.
लँड बँकेचे यूजर फ्रेंडली अॅप
• लॉगिन आवश्यक नसलेले एक मोबाइल अॅप Android आणि iOS स्टोअरवर लाँच केले गेले आहे.
• लवकरच त्यात अतिरिक्त वैशिष्ट्ये उपलब्ध केली जातील.
• त्याचबरोबरीने वापरकर्त्यांना कोणत्याही लॉगिनशिवाय पोर्टल वापरण्याची परवानगी देऊन पोर्टल अधिक य़ूजर फ्रेंडली बनविले आहे.
• वापरणाऱ्यांना अधिक चांगला अनुभव मिळण्यासाठी पोर्टलचे डिझाइन आणि यूआय सतत सुधारले जात आहे.
लँडबँकेला वाढता प्रतिसाद
- संकेतस्थळ वापरकर्त्यांच्या संख्येत एप्रिल २०२१ पासून प्रत्येक महिन्यामध्ये ३०% वाढ झाली आहे.
- मे २०२१ मधील ४४१३६ यूजर्स आणि एप्रिल २०२१ मधील ३०१५३ यूजर्स यांच्या तुलनेत जूनमध्ये ५५,००० जणांनी संकेतस्थळाला भेट दिली आहे.
- मागील तिमाहीत (एप्रिल – जून २०२१) एकूण यूजर्स १३,६१० होते ज्यांपैकी १२,९९६ असे आगळेवेगळे यूजर्स होते ज्यांनी अंदाजे १.३ लाख पृष्ठ बघितली.
जगभरात लँड बँकेचे यूजर्स
• देशानुसार संकेतस्थळ बघणाऱ्यांमध्ये, भारतानंतर, अमेरिकेतील यूजर्स सर्वाधिक आहेत.
• त्याखालोखाल ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, सिंगापूर, युएई, जर्मनी आणि इंडोनेशियाचा समावेश आहे.
• इंडस्ट्री असोसिएशन, सिंगापूर इंडियन हाय कमिशन, कोरीयाचे भारतीय दूतावास, कोट्रा आणि मलेशियन व कोरियन गुंतवणूकदारांना आयआयएलबी पोर्टल आणि मोबाईल ऍप्लिकेशन चे प्रात्यक्षिक विविध कार्यक्रमाद्वारे देण्यात आले.
उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाच्या मुख्यपृष्ठाद्वारे देखील लँड बँकेची माहिती उपलब्ध आहे. औद्योगिक माहिती प्रणालीवर क्लिक केल्यावर गुंतवणूकदारांच्या तपशीलवार प्रवेशासाठी पृष्ठास https://iis.ncog.gov.in/parks/login1 वर रिडायरेक्ट केले जाईल. याव्यतिरिक्त, लँड बॅंकेसंबंधी माहिती इंडिया इन्स्टस्ट्रियल लँड बँक म्हणून रिसोर्स टॅब अंतर्गत इन्व्हेस्ट इंडिया संकेतस्थळावर देखील प्राप्त होऊ शकते.