Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई मनपात शिपाई ‘उद्योग’पती, पत्नीची कंत्राटदार कंपनी!

शिपायांचे एवढे उद्योग, मग बाकीच्यांचे किती?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
bmc

मुक्तपीठ टीम

नवरा शिपाई आणि त्याची पत्नी मुंबई मनपाची कंत्राटदार हा धक्कादायक प्रकार मुंबई मनपामधून समोर आला आहे. मुंबई मनपामध्ये शिपायाचे काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनी पत्नीच्या नावावर कंपनी स्थापन करून मनपाच्या कोरोना सेंटरमध्ये कोट्यवधीची कामं मिळवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मनपात नोकरी करणाऱ्या या भलत्या ‘उद्योग’पती शिपायांचं एवढं चालत असेल तर बाकीच्यांचे किती उद्योग चालत असतील, अशी चर्चा आता मनपाच्या वर्तुळात रंगू लागली आहे. भाजपाचे मुंबईतील नेते भालचंद्र शिरसाट यांनी या प्रकरणी केवळ दोघांविरोधात कारवाई नको, तर त्यांच्यावर ज्यांचा वरदहस्त असावा असे सत्ताधारी नेते आणि त्यांना वापरून घेणारे प्रशासकीय अधिकारी यांचाही शोध घेऊन कारवाईची मागणी केली आहे.

 

मुंबई मनपाच्या घनकचरा विभागात अर्जुन नराळे तर देखभाल विभागातील रत्नेश भोसले हे चतुर्थश्रेणी शिपाई आहेत. त्यांचे पगार काही हजार रुपये असले तरी त्यांच्या बायकांनी मात्र कोरोना काळात महापालिकेची कोट्यवधी रुपयांची कामं मिळवली आहेत. हे उघडकीस आल्यानंतर आता या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

 

पत्नी माझी उद्योगी!

  • अर्जुन नराळेची पत्नी अपर्णाच्या नावे असलेल्या श्री एंटरप्रायजेस आणि कंपनीने गेल्या दीड वर्षात एक कोटी ११ लाख रुपयांची कामे मिळवली आहेत.
  • तर रत्नेश भोसलेची पत्नी रियाच्या नावे ‘आर. आर. एंटरप्रायजेस’ नावाची कंपनी असून त्यांनी ६५ लाख रुपयांची कामं मिळालीत.
  • मनपाच्या नाना चौकातल्या डी विभाग कार्यालयात विविध वस्तू पुरवठा करण्याचं काम या दोन कंपन्यांनी केलं आहे.
  • पालिकेच्या डी विभागात कोरोना काळात कुठलीही वस्तू लागली तरी त्याचा पुरवठा करण्याचे काम या दोन कंपन्यांनी केलं.

 

कोरोना काळातील उद्योग!

  • स्क्रू ड्रायव्हरपासून कॉम्प्युटर पार्टपर्यंत आणि टेबलापासून भाड्याने गाड्या देण्यापर्यंतची काम या कंपनीमार्फत होत होती.
  • यात कोरोना सेंटरमधील रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सिमीटर, इलेक्ट्रिक केटल, स्टीमर या वस्तूंचाही समावेश आहे.
  • माहितीच्या अधिकारातून हा सर्व घोटाळा समोर आला आहे.

 

पत्नींच्या उद्योगात गैर काय?

  • मनपा कर्मचाऱ्यांच्या पत्नी किंवा कुटुंबीय काय करतात, त्यावर मनपाचे निर्बंध नसतात.
  • पण मुंबई मनपाच्या अधिनियमानुसार मनपात नोकरीला असलेल्या व्यक्तीला किंवा त्याच्या जवळच्या नातेवाईकांना मनपाची अशी कंत्राटे घेता येत नाहीत.
  • परंतु या दोघांनी मात्र नियम धाब्यावर बसवत स्वत:च्या पत्नींच्या नावे कंपनी उघडून कोट्यवधींची कामे मिळवली आहेत.

 

शिपायांची एवढी हिंमत नसणार, वरदहस्त कुणाचा?

  • भाजपाचे नेते भालचंद्र शिरसाट यांनी या प्रकरणाविषयी वेगळाच संशय व्यक्त केला आहे.
  • महानगरपालिकेच्या सेवेतील दोन चतुर्थश्रेणी कर्मचारी एवढी हिंमत दाखवतील असं वाटत नाही.
  • हे दोघेही कुणाचे तरी हस्तक असावेत. त्यांना वापरून घेतलं असणार.
  • या दोघांना वापरणारे एक तर प्रशासनातील अधिकारी असतील किंवा सत्ताधारी बडी धेंड असतील.
  • या प्रकरणी केवळ दोघांविरोधात कारवाई करु नये, तर सत्ताधारी शिवसेना, प्रशासकीय अधिकारी यांच्यपैकी कुणी सामील आहे का, त्याचा शोध घेण्यात यावा.

Tags: BMCआर. आर. एंटरप्रायजेसकोरोना सेंटरमुंबई मनपाशिपाईश्री एंटरप्रायजेस
Previous Post

चंद्रपूर दारु बंदी उठवण्याच्या विरोधात आझाद मैदानावर निदर्शने

Next Post

मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात सर्वात मोठा वाटा गुजरातला!

Next Post
narendra modi

मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात सर्वात मोठा वाटा गुजरातला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!