मुक्तपीठ टीम
तुम्ही लोकांसाठी अहोरात्र झटताय… तुम्ही पुढे या… म्हणत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सभागृहाच्या कोपर्यात उभ्या असलेल्या परिचारिकांचा पुष्पगुच्छ देत सन्मान केला… विशेष म्हणजे त्यांच्या आग्रहाखातर त्यांच्यासोबत जयंत पाटील यांनी फोटोही काढले.
हा प्रसंग मुंबईच्या गोरेगाव येथील श्री साई क्लिनिक आणि पार्वतीबाई शंकरराव चव्हाण हॉस्पिटल यांच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या उद्घाटन कार्यक्रमात घडला.
बऱ्याच वेळेला राजकीय नेते आपल्या स्वभावाच्या माध्यमातून जनतेची मने जिंकत असतात. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही सभागृहाच्या कोपऱ्यात उभ्या असलेल्या परिचारिकांचा सत्कार करत अनेकांची मने जिंकली…
यावेळी या हॉस्पिटलच्या परिचारिका सभागृहाच्या कोपऱ्यात उभ्या राहून कार्यक्रम पाहत होत्या. त्यांच्यापैकी अनेकांना जयंत पाटील यांना भेटण्याची इच्छा होती. जयंत पाटील यांना कळताच त्यांनी परिचारिकांना स्टेजवर येण्याचे आमंत्रण दिले व त्यांचा सन्मान केला शिवाय मंत्री जयंत पाटील यांनी त्यांच्याशी संवाद साधला.