Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता एकनाथ खडसेंच्या पत्नीलाही ईडीचं समन्स! जावई-सासरे-सासू…नंतर कोण?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
eknath khadse

मुक्तपीठ टीम

भोसरी एमआयडीसी जमीन व्यवहार प्रकरणी जावई गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना यांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. गुरुवारी ईडीच्या कार्यालयात खडसेंची तब्बल ९ तास चौकशी करण्यात आली. यावेळी खडसेंसोबत त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही ईडीने समन्स बजावले होते. मात्र मंदाकिनी यांनी ईडीकडे वेळ वाढवून मागितली आहे, अशी माहिती समोर येत आहे. ईडीनं खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केली आहे. त्यानंतर खडसे आणि आता त्यांची पत्नी. त्यानंतर आणखी कोण ईडीच्या यादीत असेल , त्याची चर्चा सुरु झाली आहे.

 

जावयाच्या अटकेनंतर पत्नीलाही ईडीचे समन्स-

  • जावई गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर एकनाथ खडसे यांना समन्स बजावण्यात आला यावेळी खडसेंची पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही भोसरी एमआयडीसी जमीन व्यवहार प्रकरणी चौकशीसाठी ईडीकडून समन्स बजावण्यात आले होते.
  • एकनाथ खडसेंच्या चौकशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच 7 जुलै रोजी मंदाकिनी यांना हजर राहण्याचे आदेश होते.
  • मात्र त्यांनी निवेदन देऊन १४ दिवसांची वेळ मागितली आहे.
  • परंतु ईडीने त्यांना अजून कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.

 

खडसेंची ईडी कार्यालयात ९ तास चौकशी-

  • पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने गुरुवारी एकनाथ खडसे यांची चौकशी केली.
  • खडसे यांनी मात्र हा तपास राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप ‘ईडी’ कार्यालयात हजर होण्यापूर्वी केला.
  • नऊ तास चौकशी ईडीने खडसे यांची नऊ तास चौकशी केली.
  • सकाळी ११ च्या सुमारास खडसे ईडी कार्यालयात हजर झाले.
  • रात्री आठच्या सुमारास ते या कार्यालयातून निघाले.
  • चौकशी झाल्यावर ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर ते थेट आपल्या गाडीत बसून रवाना झाले.
  • त्यांच्या वकिलांनी माध्यमांना या चौकशीची माहिती दिली.
  • यावेळी वकिलांनी ईडी चौकशीसाठी जितक्या वेळा बोलावेल तितक्या वेळा हजर राहण्याचं खडसेंनी आश्वासन दिल्याचं सांगितलं.

 

काय म्हणाले एकनाथ खडसेंचे वकील ?

  • भोसरी येथील भुखंडखरेदीबाबत खडसे यांच्याकडे चौकशी करण्यात आली.
  • यावेळी त्यांच्या संपत्तीची संपूर्ण चौकशी करण्यात आली.
  • चौकशीत आम्ही सर्व प्रकारचं सहकार्य केलं.
  • ईडीला जी कागदपत्रं हवी होती ती सगळी दिली आहेत.
  • ईडीला अजून काही कागदपत्र येत्या १० दिवसांत देणार आहे.
  • गरज भासल्यास चौकशीला उपस्थित राहिल असं खडसेंनी इडीला सांगितले असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे.

 

चौकशीपूर्वी खडसे काय म्हणाले होते?

  • एकनाथ खडसे यांना ईडीने समन्स बजावले आहेत.
  • चौकशीला हजर राहण्यापूर्वी खडसेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
  • या कारवाईमागे राजकीय सुडाचा वास येतोय.
  • मी पक्ष बदलला.
  • भाजप सोडून राष्ट्रवादीत आलो.
  • त्यानंतर माझ्या चौकश्या सुरू झाल्या.
  • राजकीय हेतूने ही कारवाई सुरू आहे.
  • नाथाभाऊना कुठून तरी छळावं, नाथाभाऊंना अडकवण्यात यावं असा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.
  • जळगावमध्ये व्हॉट्सअॅपवर भाजप कार्यकर्त्यांच्या ग्रुपवर अभी कुछ होनेवाला है असा मेसेज फिरत आहे.
  • ज्या अर्थी हे कार्यकार्त्यांच्या ग्रुपवर फिरत आहे म्हणजे हे षडयंत्रच आहे.
  • पण मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे, असं खडसे म्हणाले होते.

Tags: EDEknath KhadseGirish ChaudhariMandakini Khadseईडीएकनाथ खडसेगिरीश चौधरीमंदाकिनी खडसे
Previous Post

मुंबईनंतर आता राज्यासाठी गरज कोरोना नियंत्रणाच्या विदर्भ मॉडेलची! गुरुवारी विदर्भात फक्त १५६ नवे रुग्ण!!

Next Post

“मविआ एकत्रितपणे निवडणुकांना सामोरे जाईल की नाही याची मुख्यमंत्र्यांना शंका”: प्रविण दरेकर

Next Post
pravin darekar

"मविआ एकत्रितपणे निवडणुकांना सामोरे जाईल की नाही याची मुख्यमंत्र्यांना शंका": प्रविण दरेकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!