मुक्तपीठ टीम
भारतामध्ये इन सिरीज स्मार्टफोन्सने धमाल करणारी स्वदेशी टेक कंपनी मायक्रोमॅक्स एकदा चीनी स्मार्टफोन कंपन्यांना धक्का देणार आहे. पुढच्या आठवड्यात मायक्रोमॅक्सच्या इन सिरीज मोबाईलमध्ये आणखी एका जबरदस्त फोनचा समावेश होणार आहे. खूप दिवासांपासून चर्चेत असलेला मायक्रोमॅक्स इन 2 सी आता लाँच होणार आहे. हा स्मार्टफोन फिचरनं मस्त आणि किंमतीत मात्र स्वस्त असणार आहे. त्याची किंमत दहा हजारापेक्षाही कमी असेल. मायक्रोमॅक्स इन २सी ला १० हजार पेक्षा कमी प्राइस रेंज मध्ये लॉन्च केले जाईल. १५ जुलै ला त्याला भारतात लॉन्च केले जाईल.
मायक्रोमॅक्स स्मार्टफोनची वैशिष्ट्ये
• मायक्रोमॅक्स २सी हा नवा स्मार्टफोन अँड्रॉइड ११ ओएससह असेल.
• या फोनला सिंगल कोर टेस्ट मध्ये ३४७ पॉइंट मिळाले आहेत.
• एन्ट्री लेव्हल ऑक्टा कोर यूनिसोक टी६१० प्रोसेसर असू शकतो.
• प्रोसेसर १.८० एचझेड क्लॉक स्पीड सोबत असेल.
• मायक्रोमॅक्सच्या ह्या फोन ला ४ जीबी रॅम सोबत ही ६४ जीबी आणि १२८ जीबी स्टोरेज ऑप्शन मध्ये लॉन्च केले जाईल.
• मायक्रोमॅक्स २सीमध्ये स्टँडर्ड रिफ्रेश रेटसोबत एलसीडी पॅनलवाला डिस्प्ले असेल.
• मायक्रोमॅक्सच्या या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असू शकेल.
• ५,००० एमएएचची बॅटरी अस शकते.