मुक्तपीठ टीम
केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्या उपस्थितीत नुकतेच या ऑलिंपिक थीम साँगचे लाँचिंग करण्यात आले. त्यांनी त्या गाण्याचा संपूर्ण व्हिडीओ ट्वीट केला आहे. मोहीत चौहान यांनी हे गाणे गायले आणि संगीतबध्द केले आहे.
भारताकडून एकूण १०१ खेळाडू १४ प्रकारात ऑलिंपिक मध्ये सहभागी होणार आहेत. यात हॉकी, धनुर्विद्या, अँथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, घोडेस्वारी, तलवारबाजी, गोल्फ, जिमनॅस्टिक, रोईंग, सेलिंग, शुटींग, टेबल टेनिस, रेसलिंग आदी प्रकारात भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत. या ऑलिंपिकमध्ये आपल्या भारतीय संघाकडून जास्तीत जास्त पदकांची अपेक्षा आहे. त्यामुळेच त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी हे गाणे आहे.
“तीर की तरह तू चल चुकें ना निशाना
लक्ष्य तेरे सामने है चुके ना निशाना”
अशा शब्दांनी, उत्साहवर्धक संगीतानं सजलेलं हे भारतीय संघाचं ऑलिंपिक गीत एक वेगळाच जोश निर्माण करतं. देशाच्या तिरंग्याची आण देत देशाच्या विजयाची जाण निर्माण करणारं हे गाणं झपाट्यानं व्हायरल होत आहे.