Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“उल्हासनगर येथील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी समिती गठीत”: एकनाथ शिंदे

July 8, 2021
in सरकारी बातम्या
0
Min Eknath Shinde

मुक्तपीठ टीम

उल्हासनगर येथील धोकादायक इमारतींचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्याची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव १ व २, सहकार आयुक्त, ठाणे जिल्हाधिकारी, सेटलमेंट आयुक्त आणि उल्हासनगर महापालिका आयुक्त आणि शहर नियोजन तज्ज्ञांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे. या समितीला आपला अहवाल सादर करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

 

उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. नागरिकांना तातडीने दिलासा देण्याच्या दृष्टीकोनातून मंत्रालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत कल्याण डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी आणि महेश पाठक, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजा दयानिधी उपस्थित होते.

 

पुनर्विकासाचे सर्वंकष धोरण तयार करण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला असून, येत्या १५ दिवसात ही समिती शासनाला आपला अहवाल सादर करेल. या समितीने केलेल्या शिफारशीनुसारच उल्हासनगरच्या प्रदीर्घ रखडलेला पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न असेल. जीव मुठीत धरून गुजराण करणाऱ्या लोकांचा जीव वाचवण्याला प्राधान्य असल्याने हा अहवाल सादर झाल्यावर तातडीने त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी घेऊन नवीन धोरण अमलात येईल, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

 


Tags: dangerous buildingsMinister Eknath Shindeउल्हासनगरएरनाथ शिंदेखासदार श्रीकांत शिंदेडॉ. बालाजी किणीकर
Previous Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’च्या टिमचे कौतुक

Next Post

“खडसे राष्ट्रवादीत, त्यामुळे भाजपाकडून केंद्रीय एजन्सीचा गैरवापर!”- जयंत पाटील

Next Post
jayant patil

"खडसे राष्ट्रवादीत, त्यामुळे भाजपाकडून केंद्रीय एजन्सीचा गैरवापर!"- जयंत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!