मुक्तपीठ टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करतानाच काही मंत्र्यांना घरीही पाठवले. या मेगाफेरबदलांनंतर मोदी सरकारमध्ये अनेक नवे चेहरे सहभागी झाले आहेत. या नव्या मंत्र्यांमध्ये आठ वकील, चार डॉक्टर, दोन माजी आयएएस अधिकारी आणि चार एमबीए पदवीधारक आणि अनेक अभियंते आहेत.
अश्विनी वैष्णव-
- अश्विनी वैष्णव, यांना दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान व्यतिरिक्त रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्या १९९४ बॅचच्या माजी आयएएस अधिकारी आहेत.
- ५० वर्षीय राज्यसभेच्या खासदारांनी व्हार्टन स्कूल, पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून एमबीए आणि आयआयटी कानपूर येथून एमटेक केले आहे.
- आपल्या कार्यकाळात त्यांनी १५ वर्षांहून अधिक काळ महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या हाताळल्या आहेत आणि खासकरुन पायाभूत सुविधांमध्ये पीपीपी मॉडेलच्या योगदानासाठी ओळखले जाते.
ज्योतिरादित्य शिंदे
- कॉंग्रेसचे माजी नेते आणि आता भाजपचे राज्यसभेचे सदस्य ज्योतिरादित्य शिंदे यांचा खासदार म्हणून पाचवा कार्यकाळ आहे.
- त्यांना नागरी उड्डाण मंत्रालयाची जबाबदारी दिली आहे.
- एकेकाळी हे खातं त्यांचे वडिल माधवराव शिंदे यांनी सांभाळले होते.
- त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीए केले आहे आणि हार्वर्ड विद्यापीठातून बीए केले आहे.
राजीव चंद्रशेखर
- कर्नाटकचे प्रतिनिधित्व करणारे राज्यसभा सदस्य राजीव चंद्रशेखर यांनी हार्वर्ड विद्यापीठातील अॅडव्हान्स मॅनेजमेंट प्रोग्रामसह इलिनॉय इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून कॉम्प्यूट सायन्स विषयात एमटेक केले आहे.
- बीपीएल मोबाईल या एकेकाळच्या नावाजलेल्या मोबाइल सेवा कंपनीचे ते सर्वेसर्वा होते.
- भाजपा समर्थनाच्या टोकाच्या भूमिकेमुळे गेली काही वर्षे चर्चेत आणि वादातही असणाऱ्या रिपब्लिक टीव्ही समुहात त्यांची गुंतवणूक असल्याची चर्चा आहे.
रामचंद्र प्रसाद सिंह
- रामचंद्र प्रसाद सिंह हे बिहारचे राज्यसभेचे सदस्य आहेत.
- ते माजी आयएएस अधिकारी आहेत.
- ते खासदार म्हणून दुसऱ्यांदा कार्यरत आहेत.
- ते देशाचे नवे स्टील मंत्री झाले आहेत.
- जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असणारे सिंह हे १९८४ बॅचचे सेवानिवृत्त आयएएस अधिकारी आहेत.
- त्यांनी २५ वर्षांहून अधिक काळ विविध क्षेत्रात सेवा बजावली आहे.
- त्यांनी आंतरराष्ट्रीय संबंधात एमए केले आहे.
भगवंत खुबा
- भगवंत खुबा हे कर्नाटकातील बिदर येथील लोकसभेचे खासदार आहेत.
- त्यांनी मेकेनिकल इंजिनिअरिंगमध्ये बीटेक पदवी घेतली आहे.
मोदींच्या मंत्रिमंडळात हृदयरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, सर्जन आणि सामान्य चिकित्सक देखील आहेत.
सुभाष सरकार-
- सुभाष सरकार पश्चिम बंगालच्या बांकुरा येथील लोकसभेचे खासदार आहेत.
- ते स्त्रीरोगतज्ज्ञ आणि एम्स कल्याणीचे बोर्ड सदस्य आहेत.
- त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून एमबीबीएस पदवी घेतली आहे.
भागवत कराड-
- भागवत किशनराव कराड हे महाराष्ट्रातील राज्यसभेचे सदस्य आहेत.
- ते औरंगाबादमध्ये डॉ कराड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर चालवतात.
- त्यांच्याकडे एमबीबीएस, एमएस (जनरल सर्जरी), एमसीएच (बालरोग शस्त्रक्रिया) आणि एफसीपीएस (जनरल सर्जरी) पदवी आहेत.
मुंजापारा महेंद्रभाई-
- गुजरातमधील हृदयरोग तज्ज्ञ आणि वैद्यकीय प्राध्यापक म्हणून तीन दशकांच्या कारकीर्द आहे.
- मुंजापारा महेंद्रभाई हे सुरेंद्रनगरचे लोकसभेचे खासदार आहेत.
- ते जनरल मेडिसिन आणि थेरॅप्यूटिक्समध्ये एमडी आहेत.
डॉ. भारती पवार
- महाराष्ट्रातील दिंडोरी येथून पहिल्यांदा खासदार झाल्या आहेत.
- त्यांनी नाशिकहून एमबीबीएसची पदवी घेतली आहे.
- डॉ. भारती पवार या व्यवसायानं डॉक्टर आहेत.
मीनाक्षी लेखी
- मीनाक्षी लेखी अनेक वर्षे दिल्ली उच्च न्यायालयात वकीली करत होत्या.
- आता त्या सर्वोच्च न्यायालयातील वकील आहेत.
मोदी सरकारमध्ये अनेक वकील
- आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल
- भाजपा तामिळनाडूचे अध्यक्ष एल मुरुगन
- बिहार विजयाचे सूत्रधार भूपेंद्र यादव यांनीही एलएलबी केले आहे.
- प्रथमच नैनीतालचे खासदार झालेले अजय भट्ट
- खासदार सत्यपालसिंह बघेल
- भानु प्रतापसिंग वर्मा
या सर्व मंत्र्यांकडेही एलएलबी पदवी आहे.