Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“सरकारकडून लोकशाहीचा खून”

विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांचे जोरदार टीकास्त्र

July 6, 2021
in घडलं-बिघडलं
0
pravin darekar

मुक्तपीठ टीम

लोकशाही प्रक्रियेनुसार विरोधी पक्षांच्या आमदारांनी विधानभवनाच्या परिसरात अभिरुप विधानसभा भरविली, त्यामध्ये विरोधी पक्षांच्या सदस्यांनी कोणत्याही नियमांचे उल्लंघन केले नाही, तरीही सरकारने हुकुमशाही करीत विधीमंडळाच्या मार्शलमार्फत आमचे माईक, स्पीकर काढून घेतले. तसेच विधानभवनाच्या सुरक्षा रक्षक अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश देणे ही सरकाराची मनमानी असून हा एका प्रकारे लोकशाहीचा खून आहे या शब्दात विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आपला धिक्कार नोंदविला.

 

विधानसभेचे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी काल भाजपच्या १२ आमदारांना निलंबित केलं. त्यामुळे भाजप नेते आक्रमक झाले आहेत. भाजप व मित्र पक्षांच्या आमदारांनी थेट विधानभवनाच्या पायऱ्यांजवळील प्रवेशद्वावर अभिरुप विधानसभा आयोजित करत भाजपाच्या आमदारांचे चुकीच्या पध्दतीने निलंबित करण्याच्या निर्णयाचा निषेध नोंदविला. हा विषय विधानपरिषेदत उपस्थित झाल्यानंतर यासंदर्भात बोलताना दरेकर म्हणाले की, माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांना विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर बसून अभिरुपी विधानसभा भरवावी लागते. तरीही या अभिरुपी विधानसभेच्या कामकाजावर सुरक्षा रक्षकांमार्फत कारवाई करण्याचे आदेश देण्यात येतात. हे दुदैर्वी आहे. फक्त विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा हा प्रकार असल्याची टीका दरेकर यांनी केली.

 

दरेकर यांनी सांगितले की, भाजपाच्या १२ सदस्यांच्या निलंबन प्रकरणाच्या चौकशीमध्ये सत्य नक्कीच बाहेर येईल. माइक आणि स्पीकर काढून घेऊन विरोधकांचा आवाज दाबता येणार नाही. विरोधी पक्षांचे सदस्य विधानसभा कामकाजात सहभागी होत नसतील तर कामकाज स्थगित करता येते. विधिमंडळाच्या कामकाजामध्ये विरोधी पक्ष उपस्थित नसेल तर त्या कामकाजाला महत्व नसते. कारण लोकशाहीमध्ये, संविधानामध्ये विरोधी पक्षालाही तितकेच महत्व आहे, असा टोलाही त्यांनी लगावाला.


Tags: bhaskar jadhavBJPdevendra fadanvisMahavikas Aghadi governmentदेवेंद्र फडणवीसप्रविण दरेकरभास्कर जाधव
Previous Post

महानगरांमधील नव्या रुग्णांमध्ये घट: मुंबई पाचशेखाली, पुणे तीनशेखाली, नागपूर शहर फक्त ११!

Next Post

नेत्यांपरी अभिनेता बरा, १६ सरकारी रुग्णालयात सोनू सूदचे ऑक्सिजन प्लांट!

Next Post
sonu sood

नेत्यांपरी अभिनेता बरा, १६ सरकारी रुग्णालयात सोनू सूदचे ऑक्सिजन प्लांट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!