Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कंपन्याच नाही अस्तित्वात, २१३ कोटींचा कर परतावा लुबाडला!

नागपूर जीएसटी गुप्तवार्ता महासंचालनालयाकडून इनपुट टॅक्स क्रेडिट परतावा रॅकेट उघड

July 6, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
DGGI

मुक्तपीठ टीम

प्रथमच नागपूर विभागीय युनिटच्या डीजीजीआयच्या अधिकाऱ्यांनी नागपुरात अस्तित्त्वात नसलेल्या तीन कंपन्यांनी सरकारकडून कर परतावा लुबाडण्याचे रॅकेट शोधले आहे. अस्तित्वातच नसलेल्या या कंपन्यांच्या नावाने फसवणूक करून २१३ कोटी ८७ लाख रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडिट परतावा मिळवल्याचे उघडकीस आले आहे. तीन कंपन्यांची नावे पुढे आली असली तरी आणखीही काही कंपन्या या घोटाळ्यात सहभागी असण्याची शक्यता आहे. तपास यंत्रणेकडून या रॅकेटच्या मुख्य सूत्रधाराचा शोध घेतला जात आहे.

 

१ जुलै २०२१ पासून त्यांनी नागपूर येथे बनावट इनव्हॉईस रॅकेट संदर्भात विशिष्ट माहितीच्या आधारे विविध ठिकाणी शोध घेतला. निर्यातदार म्हणून काम करणार्‍या काही अस्तित्त्वात नसलेल्या संस्था आयसीडी, मिहान, नागपूर येथून तंबाखू उत्पादनांची संशयास्पद “निर्यात” करत होत्या आणि त्याच्या जोरावर त्या सीजीएसटी विभाग, हिंगणा, नागपूर कडून शेकडो कोटी रुपयांच्या इनपुट टॅक्स क्रेडीटचा परतावा घेत होत्या.

 

नसलेल्या कंपन्यांच्या नावाखाली फसवणूक!

• या कंपन्यांच्या घोषित पीपीओबीच्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यादरम्यान या तिन्ही संस्था अस्तित्त्वात नसल्याचे आढळले.
• केवळ कागदावरच त्या अस्तित्वात होत्या आणि त्यांचे भौतिक अस्तित्व नव्हते.
• नोंदणी झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत या तिन्ही अस्तित्त्वात नसलेल्या कंपन्यांनी शिपिंग बिले दाखल केली आणि पाईप्स आणि सिगारेट सारख्या सामान्य उत्पादनाची निर्यात दाखवली.
• ज्यावर २८% जीएसटी आणि भरपाई उपकर २९०% आकारला जातो.
• याच्या आधारे त्यांनी जमा आयटीसीचा २१३.८७ कोटी रुपयांचा परतावा रिफंड म्हणून मागितला आहे.
• व्यापक तपासणी दरम्यान, असे आढळून आले आहे की या तिन्ही अस्तित्त्वात नसलेल्या कंपन्यांच्या निर्मितीमागे एक सूत्रधार आहे ज्याने प्रथम संशयास्पद “निर्यात” करून नंतर फसव्या परताव्याचा दावा केला.
• या रॅकेटमागील मुख्य सूत्रधाराची ओळख आणि ठिकाणासंबंधी काही धागेदोरे मिळाले असून तपास सुरू आहे.

 

वरील परताव्यापैकी १२३.९७ कोटी रुपयांचे परतावे सीजीएसटी विभाग, हिंगणा, नागपूर यांनी जून, २०२१ च्या पहिल्या आठवड्यात मंजूर केले होते. मात्र नागपूर विभागाच्या डीजीजीआयनी वेळेवर हस्तक्षेप केल्यामुळे या कंपन्यांनी दाखल केलेल्या ८९.९० कोटी रुपयांचा परतावा थांबवून मंजूर होण्यापूर्वी नुकसान रोखण्यात आले.

 

तपासादरम्यान जे महत्त्वाचे सत्य समोर आले आहे ते म्हणजे हे रॅकेट केवळ तीन अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांपुरते मर्यादित असू शकत नाही. त्यांनी संशयास्पद ‘निर्यात’ करण्यासाठी आणि नंतर फसव्या परताव्याचा दावा करण्यासाठी अशाच प्रकारच्या काही विशिष्ट कंपन्या एका खास अधिकारक्षेत्रात सुरु केल्या आहेत असे दिसून येत आहे. त्याचबरोबर तपासही सुरु आहे.


Tags: GST FRAUD RACKETnagpurजीएसटीडीजीजीआयनागपूर
Previous Post

भारत सरकारने दोनदा सांगितले, तरीही फायझरने लसीचा परवानाच मागितला नाही!

Next Post

“फोन टॅपिंगमुळे आमदारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा!”

Next Post
jayant patil

"फोन टॅपिंगमुळे आमदारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!