अपेक्षा सकपाळ
कला दिग्दर्शक राजेश साप्ते यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक सुसाईड नोट आणि एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. त्यातूनच चित्रपट उद्योगातील काही यूनियन नेता त्यांना त्रास देत असल्याचा आरोप केला होता. दरम्यान राजेश साप्ते यांना लवकरात लवकर न्याय मिळावा आणि चित्रपटसृष्टीत यूनियनच्या नावाखाली माफियागिरी करणाऱ्यांची दहशत संपावी, यासाठी आणि मराठी कलाकार तसेच शिवसेना – मनसेचे नेते व्यक्त करत असलेल्या प्रतिक्रिया एक समान आहेत.
एवढ्या चांगल्या माणसाला असं पाऊल का उचलावं लागलं? – निवेदिता सराफ
निवेदिता सराफ यांनी व्हिडिओच्या माध्यमातून राजेश यांच्या आत्महत्येप्रकरणी सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे. त्या म्हणाल्या की, नमस्कार मी निवेदिता सराफ. आज हा व्हिडिओ करताना मला अतिशय दु:ख होत आहे. आमचे कला दिग्दर्शक राजू साप्ते यांनी आत्महत्या केली आहे. खरंतर कुठल्याही प्रॉब्लेमवरती आत्महत्या हे सोल्यूशनच असू शकत नाही. इतक्या टॅलेंटेड, इतक्या मनमिळावू, इतक्या मितभाषी माणसाला हे असं पाऊल का उचलावं लागलं? त्याने जो व्हिडिओ केला आहे त्याच्यात त्यानी असं म्हटलय यूनियनच्या जाचाला कंटाळून शेवटी त्याला हे पाऊल उचलावं लागतयं. अग बाई सुनबाईच्या निमित्ताने मी त्यांच्या संपर्कात आले. अतिशय टॅलेंटेड माणूस अक्षरश: तीन चार दिवसात त्याने आमचा सेट उभा केला. महाराष्ट्राबाहेर जेव्हा आम्हाला शूटिंग करावं लागलं तेव्हा असेल त्या साधनात त्याने आम्हाला घर बनवून दिलं. त्यांच्याबरोबर त्यांची जी ही टीम आमच्याकडे काम करतेय ती गेली पाच वर्ष त्यांच्या संपर्कात आहेत. गेली पाच वर्ष ती त्यांच्यासोबत काम करत आहेत. ते सगळे कामगार नेहमी सांगतात ते अतिशय दिलदार होते आणि त्यांनी कधीच कोणाचही पेमेंट अडवलं नव्हतं. मग त्यांच्यावरती हे असे आरोप का केले गेले? असा सवाल त्यांनी केला आहे. पुढे त्या म्हणाल्या, खरचं या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन त्यांचा शोध घेतला पाहिजे. आज त्या माणसाकडे पाच पाच प्रोजेक्ट होते. त्या पाच पाच प्रोजेक्टमध्ये त्याची जी काही माणसं होती, ती ३०-३५ माणसं पोरखी झाली.आज त्यांचा परिवार पोरका झाला. हे सगळं का घडलं? माझी खरचं अतिशय कळकळीची विनंती आहे. सगळ्या संबंधित लोकांना, मा, मुख्यमंत्र्यांना, राजसाहेब ठाकऱ्यांना, अमेय खोतकरांना की या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन जी काय किड लागली आहे, ती उकरून टाकली पाहिजे, अशी विनंती त्यांनी केली. राजू साप्ते यांच्या परिवाराचे आपण काय सांत्वन करणार ते करायला आपल्यापाशी शब्दचं नाही आहेत. पण त्यांना न्याय नक्कीच मिळाला पाहिजे, अशी विनंती त्यांनी केली.
#JusticeForRajuSapte @SarafNivedita thank you 🙏🏻 pic.twitter.com/TLRi0rya8r
— Vaibhav Shetkar (@vaibhavshetkar) July 5, 2021
राजू साप्तेंना लवकरात लवकर न्याय मिळो! – रवी जाधव
रवी जाधव यांनी ही ट्विट केले आहे की, काल राजू साप्ते या अत्यंत अभ्यासू आणि गुणी कला दिग्दर्शकाने काही समाजकंटकाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली हे अत्यंत दूर्दैवी आहे. राजू हा माझा जे. जे. मधील वर्ग मित्र.
त्याला लवकरात लवकर न्याय मिळो आणि त्याच्या आत्म्याला शांती लाभो हिच प्रार्थना.
काल राजू साप्ते या अत्यंत अभ्यासू आणि गुणी कला दिग्दर्शकाने काही समाजकंटकाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली हे अत्यंत दूर्दैवी आहे. राजू हा माझा जे. जे. मधील वर्ग मित्र.
त्याला लवकरात लवकर न्याय मिळो आणि त्याच्या आत्म्याला शांती लाभो हिच प्रार्थना 🙏#justiceforrajusapte pic.twitter.com/PmtkDb4MPj— Ravi Jadhav (@meranamravi) July 4, 2021
यूनियन नेत्यांवर सदोष मनुष्य हत्येचा गुन्हा दाखल करा – गजानन कीर्तिकर
दरम्यान, शिवसेनान नेते खासदार गजानन किर्तिकर यांनी राजेश साप्ते यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याऱ्या राकेश मौर्या यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.
ते म्हणाले की, फिल्म स्टुडिओ आणि अलाईड मजदूर युनियनच्या विदयमान कार्यकारिणी पदाधिका – यांकडून सदस्यांना होत असलेल्या उपद्रवाबाबत आपणाकडे विस्तृत निवेदन सादर केले होते . या युनियनचे खजिनदार राकेश मौर्या यांच्या मनमानी व दादागिरी बाबत युनियन देखील आपणाकडे वारंवार तक्रार दाखल केली आहे . पोलीस ठाणेकडून राकेश मौर्या व त्यांचे गुंड प्रवृत्तीचे सहकारी यांचेविरूध्द कोणतीही कारवाई केली गेली नाही . परिणामी राकेश मौर्या याच्या जाचाला कंटाळून आज दिनांक ०३/०७/२०२१ रोजी पुणे येथे या युनियनचे सदस्य राजू साप्ते , कला दिग्दर्शक यांनी आत्महत्या केली . आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी व्हिडिओ रेकॉडींग करून मोबाईलवरून आपल्या सर्व सहका – यांना सूचीत केले की , राकेश मौर्या यांच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करीत आहे . सदर बाब अत्यंत गंभीर आहे . पोलीस विभागाने वेळीच हस्तक्षेप करून राकेश मौर्या व त्यांचे सहकारी यांचेविरुध्द कारवाई केली असती तर आज साजू माने यांना आत्महत्या करावी लागली नसती.
उपरोक्त घटनाक्रम लक्षात घेता, राकेश मौर्या यांचेविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा जेणेकरून युनियनच्या इतर भयग्रस्त कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल.
सोबत राजू साप्ते यांच्या आत्महत्येपूर्वीच्या निवेदनाची पेनड्राईव्ह मध्ये क्लीप देत आहे.
कृपया पोलीस उपायुक्त या नात्याने आपण व्यक्तिश: याबाबत कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल मला ७ दिवसात आवगत करावा, ही विनंतीही त्यांनी केली आहे.
कामगार युनियनच्या त्रासाला कंटाळून मराठी कलादिग्दर्शक राजू सापते यांनी आत्महत्या केली. या युनियनच्या भोंगळ कारभाराबाबत आज पत्रकारांशी संवाद साधला. https://t.co/vwqGuf1Zr7
— Gajanan Kirtikar -गजानन कीर्तिकर (@GajananKirtikar) July 5, 2021
मराठी कलासृष्टीला मिळणार मनसे सुरक्षा
मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी राजेश साप्तेंच्या आत्महत्येचा दुर्दैवी घटना असा उल्लेख केला आहे. राजू साप्तेच्या बाबतीत घडली त्या बाबत ह्या परप्रांतीय मुजोरीला संपवण्यासाठी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी गंभीरपणे लक्ष घालण्याचे ठरवले आहे, असे त्यांनी जाहीर केले आहे. अमेय खोपकर, शालिनी जितेंद्र ठाकरे, शशांक नागवेकर यांच्या नावाने जारी निवेदनात अन्याय होत असेल तर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
होय #मी_धमकी देतोय… याला #धमकी समजा…
याच्या पुढे कोणत्याही निर्मात्या, दिग्दर्शक, कलाकाराला जर सेट वर जाऊन त्रास दिलात तर हातपाय तोडून ठेवल्या शिवाय राहणार नाही…— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) July 4, 2021
हेही वाचा: कला दिग्दर्शक साप्तेंची आत्महत्या, भाजपा आमदाराच्या चौकशीची मागणी
कला दिग्दर्शक साप्तेंची आत्महत्या, भाजपा आमदाराच्या चौकशीची मागणी