मुक्तपीठ टीम
न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये इंजिनीअर या पदासाठी एकूण २६ जागांसाठी भरती आहे. नोकरीचे ठिकाण कर्नाटक येथे आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २९ जुलै २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, ६०% गुणांसह बी.ई./ बी.टेक/ बी.एससी इंजिनीअर (सिव्हिल/मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल अॅन्ड इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड कम्युनिकेशन/ कॉम्प्युटर सायन्स/ इन्फॉर्मेशन सायन्स) असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्ष असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी
न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://www.npcil.nic.in/Content/Hindi/index.aspx वरून माहिती मिळवू शकता.