मुक्तपीठ टीम
मूळ भारतीय असणारी एक १५ वर्षाची मुलगी पर्यावरण संरक्षणासाठी मोहीम राबवित आहे. दुबईत राहणाऱ्या रिवा तुळपुळेने गेली ४ वर्षे सुमारे २५ टन इलेक्ट्रॉनिक कचर्यावर पुनर्प्रक्रिया करण्यात हातभार लावला आहे. ती ‘वी-केअर डीएक्सबी’ नावाची मोहीम चालवते. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या मदतीने तिने या ई-कचरा व्यवस्थापनात १५ शाळांमधील ६० मुलांना देखील सहभागी करुन घेतले आहे.
इंटरनेट आणि सोशल मीडियाची मदतीने तिने या ई-कचरा व्यवस्थापनात १५ शाळांमधील ६० मुलांना देखील सहभागी करुन घेतले आहे. ती मुलेही पर्यावरण संरक्षणासाठी कार्य करीत आहेत. रेवाचे कुटुंब काही वर्षांपूर्वी घर बदलत होते. सामानाची बांधाबांध करताना एकदा तिने आईला विचारले आपल्याला ज्या वस्तूंची गरज नाही त्या फेकून द्यायच्या का? त्या म्हणाल्या नाही, अनावश्यक वस्तू देखील योग्य पद्धतीने फेकण्याची आवश्यकता आहे. पण त्यावेळी आईला नेमक काय बोलायच होत हे रिवाला कळलं नाही.
म्हणून रिवाने इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या मदतीने काही माहिती मिळवली. तेव्हा इलेक्ट्रॉनिक जंक ही एक मोठी समस्या होती. ते पुनर्वापर करता येते. पण तेवढे होत नाही. त्यामुळे रीवाने तिच्या काही मित्रांच्या मदतीने या दिशेने काम करण्याचे ठरविले. हळूहळू एक टीम तयार झाला आणि आज रीवा या ई-कचरा व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण योगदान देत आहे.
पाहा व्हिडीओ :