मुक्तपीठ टीम
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्यासमोर तुम्ही एक काचेची शिल्ड पाहिली असेल. कोरोना संसर्गाचा धोका खूप कमी करणारी ती शिल्ड बनवणारा कलाकार आपला मराठी माणूस आहे. गणपतीबाप्पासाठीच्या आकर्षक मखरांसाठी लोकप्रिय असलेल्या लालबागच्या नानासाहेब शेंडेंनीच ती बनवलीय. त्यांनी कोरोना संसर्गाचं विघ्न टाळण्यासाठी खास ग्लास शिल्ड तयार केली.
कोरोना पसरतो तो तोंडातून, नाकातून उडणाऱ्या अगदी सुक्ष्म एरोसोल्समधून. ते रोखण्यासाठी आपण मास्क वापरतो. पण त्याच्याही पुढे जात नानासाहेबांनी काचेची शिल्ड बनवली. त्यामुळे सुरक्षेची एक भिंतच तयार झाली. मंत्रालयातच नाही तर कार्पोरेट सेक्टरमध्येही त्यांच्या काचेच्या शिल्डना चांगली मागणी आहे. जिथं जिथं लोक जनसंपर्कात जास्त असतात तिथं तिथं तुम्हाला नानासाहेबांनी उत्पादन केलेल्या ग्लासशिल्ड नक्की दिसतील. त्यांच्या आर्टिस्ट या ब्रँडच्या शिल्ड त्यांच्या सोप्या वापर आणि उपयोगितेमुळे खूप अल्पावधीत लोकप्रिय झाल्या आहेत. त्यांना कोरोना झाला तेव्हा त्यांना लोकांच्या संपर्कात राहतानाच संसर्गापासून दूर राहण्यासाठी ग्लास शिल्डची कल्पना सुचली.
खरंतर एखादा व्यावसायिक तेवढ्यावरच समाधानी राहून नफा मिळवत राहिला असता. पण नानासाहेबांना मंत्रालयाचील काही महिला कर्मचाऱ्यांनी त्यांची अडचण सांगितली. सार्वजनिक बांधकाम खात्यात खूप वेगवेगळी लोक येत असतात. त्यांच्यातील अनेक गुटखा, पान वगैरे खाऊन येतात. तो दुर्गंध महिलांच्या सहनशक्तीची परीक्षा पाहणारा असतो. त्यावर उपाय म्हणून नानासाहेबांनी अगदी स्वस्तातील म्हणजे दीड हजारापासून सुरु होणाऱ्या खास वेगळ्या एकोनॉमी ग्लास शिल्ड तयार केल्या आहेत. म्हणजे अगदी रस्त्यावरच्या विक्रेत्या महिलेने ठरवलं तरी ती विकत घेऊ शकेल.
तुम्हाला जर या ग्लास शिल्ड खरेदी करायच्या असतील तर लालबागमधील गणेश गल्लीतील प्रभा कुटीरमध्ये असलेल्या नानासाहेबांच्या उत्सवी दुकानाला भेट द्या. तसेच नानासाहेब शेंडकर ९३२४८०४७९१ किंवा त्यांचे सुपुत्र श्याम शेंडकर ९३२४८०४७९४ या क्रमांकांवर संपर्क साधा.